Uncategorizedराजकिय

भारतीय जनता पक्षाच्या वतीने २ ऑगस्ट रोजी पुसद जिल्ह्यात भव्य अधिवेशन होणार; दीड हजार कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार- महादेव सुपारे

पुसद: विधानसभा मतदारसंघात २०२४च्या विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजपचे संघटन मजबूत करून भाजपला ताकद देण्याचे काम करण्यासाठी भाजप या मतदारसंघात ताकदीने लढणार असल्याने दि. २ ऑगस्ट२०२४ शुक्रवार रोजी अग्रवाल मंगल कार्यालय येथे ११:०० वाजता पुसद जिल्हा भाजप च्या वतीने भव्य अधिवेशन आयोजित करणार आहे. या भव्य अधिवेशनाला माजी मंत्री हंसराज अहिर यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभणार आहे तर उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री भाजपा विदर्भ प्रदेश हे ही उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे जवळपास दीड हजार पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती पुसद जिल्हा भाजपा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी दि. ३१ जुलै रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

यावेळी या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा समन्वयक,नितीन भुतडा,डॉ. आरतीताई फुपाटे उपाध्यक्षा प्रदेश अनु. जमाती सेल, निखील चिद्दरवार जिल्हा महामंत्री, ॲड.विश्वास भवरे भाजपा जिल्हा अध्यक्ष, निलेश पेन्शनवार युवा मोर्चा प्रदेश सचिव, ओम प्रकाश शिंदे पुसद तालुका अध्यक्ष, किसान मोर्चा , दीपक परिहार भाजपा शह अध्यक्ष अदी मान्यवरांची उपस्थित होती. ओमप्रकाश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. भाजपा पुसद जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी अधिवेशनाबद्दल पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, पुणे येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे भव्य संमेलन झाले. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अधिवेशन घेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे अदेश दिले त्याप्रमाणे पुसद येथे २ ऑगस्ट रोजी अधिवेशन घेण्यात येणार असून यावेळी माजी मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष (ओ.बी.सी. आयोग) हंसराज अहिर हे मार्गदर्शन करतील. उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री भाजपा विदर्भ प्रदेश हे ही मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी माजी आमदार ॲड. निलयभाऊ नाईक, आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी आमदार राजेन्द्र नजरधने, जिल्हा समन्वय नितीन भुतडा हे आवर्जून उपस्थित असणार आहेत तरी सर्व आजी माजी खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य सर्व मंडळ अध्यक्ष तालुका आणि शहर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य सर्व मंडळ अध्यक्ष तालुका आणि शहर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य सर्व आघाडी, प्रकोष्ठ व सेलचे अध्यक्ष व सदस्य, बुथ प्रमुख, केंद्र प्रमुख, माजी नगर सेवक, माजी जि.प. सदस्य, माजी पं.स. सदस्य सहकारी संस्थेचे सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी आणि सन्मानीय सदस्यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन महादेवराव सुपारे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी असलेले हे तीनही पक्ष एकत्र लढले. मात्र “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षात काम व्यवस्थित करा”, अशा सूचना दिल्या होत्या त्यामुळे भाजपाचे पुसद जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी बोलताना सांगितले की, पुढील काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे.यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close