ईतर

शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृतीचा’ समावेशास विविध सामाजिक संघटनेचा विरोध!

पुसद:राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भग्वद्गीता, मनाचे श्लोक मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.तसा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीई आरटी’ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडाही जाहीर केला आहे. परंतु यावरुन नव्या वादाला तोंड फुटले असून याला विविध सामाजिक संघटनेकडून तीव्र विरोध आहे. अभ्यासक्रम आराखड्यातून हा आक्षेपार्ह भाग काढवा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण सहनियंत्रण समिती पुसद तसेच भीम आर्मी यवतमाळ जिल्हा व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांनी उपविभागीय अधिकारी  पुसद यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल यांना निवेदन पाठवले असून त्यावर आक्षेप नोंदवित निषेध करून  विरोध दर्शविला आहे. हा जर राज्य सरकारने असे  जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार तात्काळ थांबविले नाही तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिल आहे.

या निवेदनात लिहिले आहे की.शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे.जी मनुस्मृती विषमतावादी व विभाजनवादी सामाजिक व्यवस्था निर्माण करून केवळ हिंदू धर्मीयांनाच विभाजित करीत नसून ही मनुस्मृती माणसामाणसांत भेदभाव करते अश्या विषमतावादी आणि विभाजनवादी मनुस्मृती मधील श्लोकांचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ यांनी ठेवला असल्याचे निदर्शनास आले आहे.जर असा कोणता प्रस्ताव असेल तर कोणत्याही प्रकारे मनुस्मृती सारख्या विषमतावादी आणि विभाजनवादी पुस्तकांतील श्लोकांचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये. आणि हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावाअन्यथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण सहनियंत्रण समिती पुसद व भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा यवतमाळ व भारतीय बौद्ध महासभा शाखा पुसद तालुका यांचे मार्फत लोकशाही मार्गाने मोठे जन आंदोलन उभे करू असे या निवेदनात स्पष्ट उल्लेख केलेला आहे या निवेदनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष विठ्ठल खडसे,सचिव लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष दिनेश खांडेकर,आंबादास वानखेडे दिनेश सावळे, नितेश खंदारे, विशाल पडघणे, भास्कर बनसोड, विशाल कांबळे, मुनेश्वर हाटे,भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, भारतीय बौद्ध महासभा पुसद तालुका अध्यक्ष भारत कांबळे, भोलानाथ कांबळे, ल.पु.कांबळे,भगवान खंदारे, विनोद कांबळे, तुकाराम चौरे, प्रल्हाद खडसे,बाळासाहेब ढोले, मिलिंद लोखंडे, सुरेन्द्र गावंडे, कृष्णा दांडेकर, इत्यादी तिन्ही समित्यातील अदि पदाधिकाऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close