ईतर

मतदान निर्भयपणे व शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस दल सज्ज : पंकज अतुलकर, सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, पुसद,

पुसद: पोलीस दलाकडुन जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, आगामी लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये जनतेने आपला मतदानाचा हक्क बजावुन १००% मतदान करावे. लोकसभा निवडणुक २०२४ साठी मतदान निर्भयपणे व शांततेत पार पाडण्याकरीता पोलीस दल सज्ज असुन याकरीता पोलीस दलाकडुन पुसद उपविभागामध्ये पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार, सशस्त्र दल व होमगार्ड यांचा आजपावेतो एकुण १७ ठिकाणी रुटमार्च घेण्यात आले आहेत.ज्या गावांमध्ये मतदान करण्यास निषेध करण्यात आला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडुन मिटींग घेवुन गावकऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले मतदानावर निषेध न करता नोटा (NOTA) चा वापर करुन मतदान करावे. तसेच ईव्हीएम (EVM)च्या सुरक्षेकरीता पोलीस दलाकडुन सशस्त्र गार्ड नेमण्यात आली आलेली आहे.

निवडणुक काळात दुर्गम भागात, गावांत संपर्क व्हावा याकरीता दळण-वळण यंत्रणेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच निवडणुक प्रक्रीयेवर प्रभाव टाकण्याकरीता पैशांचा, दारु, अवैध शस्त्र ईत्यादीचा दुरुपयोग रोखण्याकरीता FST व SST पथक हे २४x७ सतत वाहनांची बारकाईने कसुन तपासणी करित आहेत. असामाजीक तत्व यांचे आश्रय ठिकाणे लॉजेसची चेकींग करण्यात येत आहे. पुसद उपविभागामध्ये अवैध दारु विक्री करणारे ईसम यांचेवर मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे.पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीत सुध्दा मोठ्या प्रमाणावर अवैध दारु बाळगणे विक्री करणेच्या केसेस करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अवैध गांजाच्या केसेस करण्यात आल्या आहेत. तसेच लोकसभा निवडणुक-२०२४ मध्ये मतदान निर्भयपणे व्हावे याकरीता अवैध शस्त्र बाळगणे अनुषंगाने कोंबीग ऑपरेशन मोहीम राबवुन पो.स्टे. रेकॉर्डवरील तसेच संशईत ईसम यांचे घरांची घातक शस्त्राबाबत घर झडती घेण्यात आलेली आहे. पुसद उप विभागातील पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील गुन्हेगार, चोरीचे गुन्हयातील आरोपी, अवैधरीत्या घातक शस्त्र बाळगणारे, अवैध दारु विक्री गावठी दारु विक्री करणारे ईसम तसेच धोकादायक व्यक्ती यांचेवर मोठ्या प्रमाणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच मंगल कार्यालय,मिटींग हॉल मालकांना कोणीताही राजकीय पक्षाला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यास मंगल कार्यालय, मिटींग हॉल उपलब्ध करुन देणार नाही कुणीही आचार संहीचेते उल्लंघन करणार नाही याबाबतच्या सक्त सुचना देण्यात आल्या व आचारसंहीतेचे उल्लंघन करणा-यांविरुध्द पोलीस ठाणे पुसद (शहर), पोलीस ठाणे खंडाळा येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच विनापरवाना बॅनर्स व पोस्टर्स लावणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच शांतता समितीच्या सभा घेवुन नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलीस बळाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलेले असुन आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने VVIP यांचे सुरक्षेकरीता योग्य व मर्यादीत बंदोबस्त पुरवीण्यात आलेला असुन अतिरीक्त किंवा जास्त प्रमाणात बंदोबस्त देण्यात आलेला नाही. निवडणुक बंदोबस्ताकरीता पोलीस अधिकारी, अंमलदार, SRPF, CISF असे एकुण ७०० पोलीस मनुष्यबळ आलेले आहे. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना QRT पथक मदतीसाठी देण्यात आलेले आहे. सर्व मदतान बुथवर, क्रिटीकल बुथवर, बुथचे १०० मिटर वर व सेक्टर पेट्रोलींग करीता चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच तातडीचे मदतीकरीता आवश्यक अतिरिक्त पोलीस बल रिझर्व्ह ठेवण्यात आले आहे. निवडणुक बंदोबस्त कर्तव्यावरील पोलीस अधिकारी, अंमलदार यांची वागणुक चांगली व निपःक्षपाती राहावी याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहे.देशाचे हितासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे पवित्र व खुप महत्वाचे असुन सर्व नागरीकांनी मतदान करण्याकरीता घराचे बाहेर पडावे व निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावुन १००% मतदान करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडुन जनतेस करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close