ईतर

पुसद तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा!

पुसद: गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाल्यावर मंगळवारी दुपारनंतर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पुसद शहरांसह तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. ज्वारी, भुईमूग,हळद आणि आंब्यासह अन्य पिकांना व फळबागांना या पावसाचा तडाखा बसला. पुसद शहरासह तालुक्यात सायंकाळी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली.

तालुक्यातील ब्राह्मणगाव मंडळात चक्रीवादळ स्वरूपाचा मोठा पाऊस झाल्याने या परिसरातील शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे उन्हाळी ज्वारी, भुईमूग, शिजवून वाळत ठेवलेल्या हळदीसह आंब्याचे नुकसान झाले. १२एप्रिलदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून निवडणुकीच्या आधी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close