पुसद न.प.घरकुल आणि नमुना ‘ड’ साठी महाविकास आघाडीचे बेमुदत साखळी उपोषण सुरू!

पुसद:गोरगरिबांना घरकुलाचे हप्ते व हक्काचे घरकुलासाठी नमुना ड ची आखलेली शासनाची उपाययोजना प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षम व बेजबाबदार व कर्तव्यशून्यतेमुळे धुळखात पडल्याने कुंभकर्णी झोप घेणाऱ्यांना जागवण्यासाठी लोककल्याणाच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित साखळी उपोषणाला सामान्य जनतेने भरपूर प्रतिसाद देत सामाजिक व राजकीय संघटनांनी सुद्धा पाठिंबा दर्शवीत सहभाग नोंदविला आहे. परंतु आता लोकहिताच्या या आंदोलनाला प्रशासन व लोकप्रतिनिधी काय प्रतिसाद देतात याकडे आंदोलनकर्ते तथा पुसदकरांचे लक्ष लागले आहे.
पुसद नगरपालिका क्षेत्रातील गोरगरीब हे शासकीय जागेवर शेकडो वर्षापासून राहत असल्याने त्यांना घरकुलाचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने शासनाने नमुना ड करून देण्यासाठी उपाय योजना केली होती. व त्या दृष्टीने जनतेला आवाहन करून शेकडो गोरगरिबांकडून कागदपत्रे व रक्कम जमा करण्यात आली होती. या कामाला आज पाच वर्षे उलटूनही झोपडीतील गोरगरीब झोपडीतच राहिले आहे. तसेच नगरपालिकेच्या वतीने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना निधी अभावी पाडलेली झोपडी सोडून भाड्याच्या घरामध्ये राहावे लागत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करून जनतेवर अन्याय करीत असल्याच्या बाबीची जाणीव करून दिली. तरीही नमुना ड व घरकुलाचे रखडलेले हप्ते दिले नाही. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पुसद शहर अध्यक्ष साकीब शाह यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाला नमुना ड व घरकुल निधी सात दिवसाचे आत देण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला होता. परंतु कुंभकर्ण झोपेतील प्रशासक व लोकप्रतिनिधीनी याची दखल घेतली नाही व अखेर साकीब शाह यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या उपोषणाच्या आंदोलनाला जागृत नागरिक, सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोक कल्याणकारी आंदोलनाला जागृत पक्षांनी पाठिंबा दिल्याने आज 16 जानेवारी रोजीच्या साखळी उपोषणाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक सेल यांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. उपोषणाला सुरुवात होताच सकाळी अकरा वाजता पासून मोठ्या प्रमाणात नमूना ड पीडित, घरकुलाचे हप्त्यापासून वंचित लाभार्थी, जागरुक नागरिक, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सुद्धा भेटी देत पाठिंबा देत सहभाग नोंदवल्याने या साखळी उपोषणाला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते. या लोकहिताच्या मागणीची पूर्तता व्हावी अशी मागणी करीत महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित उपोषणाला भीम आर्मी भारत एकता मिशन, एम आय एम, शेतकरी संघटना, कुस्ती मल्लविद्या महासंघ यवतमाळ, भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह बिरसा मुंडा ब्रिगेड या सामाजिक संघटनेने सुद्धा आपला पाठिंबा दर्शविला आहे. व शहरातील जागरूक नागरिकांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे परंतु अजूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी लोकहिताच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी साकिब शाह, विकास जामकर, बुद्धरत्न भालेराव, जयानंद उबाळे, इस्तियाकभाई, वसीम पठाण, साहेबराव ठेंगे, नानाभाऊ जळगांवकर, दीपक अवचार, दीपक जाधव, रवी पांडे, अरुण राऊत, प्रीतम आळणे, मधुकर सोनवणे, भास्कर बनसोड, ललिता पोघे, संतोष दरणे, गोकर्णा पडघने, मोहन विश्वकर्मा, संजय भोने, हरीश गुरुवाणी, रवी बहादुरे, राजीक देशमुख, गजानन सूर्यवंशी, अर्जुन कुमार राठोड, अब्दुलभाई, विजय बाबर, अशोक भालेराव,अमजद बिल्डर, सुरज धनवे, नारायण कराळे, नाना बेले, शामराव व्यवहारे, मारोती भस्मे, डॉ अकील मेमन, नन्हे खा, कौसर खा, अजय पुरोहित, माधवराव वैद्य, सिद्दीक लोहार, नवाज अली, यांच्यासह अनेक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.



