ईतर

जलजीवन मिशनतर्गत निकृष्ट दर्जाचे काम!मोहा ई ग्रामपंचायतीमधील गैरप्रकार

पुसद : तालुक्यातील मोहा ई ग्रामपंचायती मधील हद्दीतील मोहा गाव शिवानगर, रामनगर व नंदपुर तांड्यामध्ये दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाइपलाइनचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार रोहन राठोड रा.मोहा ई, यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यवतमाळ व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली असून या कामात अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हे ठेकेदारासोबत संगणकमत करून शासनाची दिशाभूल करीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करीत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.राज्यातील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घरात नळाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांक्षी ‘हर घर जल’ योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून ही कामे पूर्ण केली जात आहे.या कामाची संख्या व योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी राजकीय हस्तक्षेपामुळे ठेकेदार यांना अनुभव नसतानाही कामे देण्यात आली आहे. परंतु ही योजना दीर्घकालीन तसेच मोठ्या निधीची असल्याने या ठेकेदारांना कोणताही अनुभव नसल्याने योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे प्रकार तालुक्यातील सर्रासपणे उघड होत आहे.पुसद पंचायत समितीच्या अधिनस्त असलेल्या तालुक्यातील मोहा ई गावाला पिण्याच्या पाण्यासाठी नुतनीकरण पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने लवकर काम करण्यासाठी नियमांना फाटा देत मंजूरात आराखड्या नुसार कामे न करता नालीची खोली व रुंदी काही ठिकाणी आर्धा फुटांवर टाकून निकृष्ट दर्जाचे पाइपलाइन थातुरमातुर लेव्हलीग सुध्दा न करता प्रत्येक घरी नळ कनेक्शन नदेता नाहरकत प्रमाणपत्र व टेस्टिंग रिपोर्ट तयार करून बोगस बिले तयार करून काही ठिकाणी तर जुन्याच पाइपलाइन कन्कशन जोडून शासनाची फसवणूक करून बिले काढली जात आहे त्यामुळे या दर्जाची कामे करून पाणीपुरवठा इंजिनियर ग्रामपंचायत चे पदाधिकारी यांनी ठेकेदारासोबत संगणकमत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार दि.४/१२/२०२३व१/८/२०२२ मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यवतमाळ, उप अभियंता पाणीपुरवठा विभाग पुसद यांच्याकडे माणिक बन्सी जाधव तसेच रोहन नामदेव राठोड यांनी केले असून अंदाजे २५ ते ३० लाख रुपयाचे बिले काम न करता काढल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. सदर तक्रारीची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी तसेच ठेकेदार यांच्यावर कारवाई करून यापुढे ठेकेदाराचे देयके देण्यात येऊ नये मागणी केली आहे.तर आम्ही मोहा ई ग्रामपंचायतचे सचिव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मी सुट्टीवर असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close