पुसद येथे राज्यस्तरीय आंध आदिवासी उपवर वधू परिचय मेळावा संपन्न;दीडशेच्या वर युवक युवतींनी दिला परिचय

पुसद: आदिवासी समाजामध्ये उपवर वधू परिचय मेळावा घेतल्याने वेळेची पैशाची बचत आणि मोठं हक्काचा व्यासपीठ व्हावं या उदात्त हेतूने पुसद्आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आंध आदिवासी उपवर वधू परिचय मेळावा मोठ्या ,थाटात पार पडला या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार उत्तमराव इंगळे तर प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी सनदी अधिकारी संभाजीराव सरकुंडे माझी उपयुक्त सामाजिक न्याय माधवराव वैद्य नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. जनाबाई डुडुळे यवतमाळ जि.प च्या माजी सौ.नंदिनी टारपे ज्ञानेश्वर तडसे श्रीमती आशाताई पांडे प्रकाश झळके रंगराव काळे वर्षाताई वैद्य,सुनील ढाले शामराव व्यवहारे नारायण कऱ्हाळे, सुरेश धनवे राजेश ढगे गंगाराम काळे सौ.सुनिता राजेश डवरे सह मान्यवर उपस्थित होते परिचय मेळाव्यास राज्यातील हजारो बांधव उपस्थित होते.
उपवर- वधूंच्या परिचयासाठी हक्काचे व्यासपीठ आम्ही उभं केले असल्याचे आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण टारफे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगितले मेळावा मध्ये जास्त प्रमाणात भाषणबाजी न ठेवता युवकांचा परिचय देऊन त्यांचे मनोबल वाढविल्याने आपापल्या आवडीनिवडीचे जोडीदार त्यांना मिळावे राज्यातील कानाकोपऱ्यामधून उपवर वधू व समाजबांधव हजारोनी उपस्थित झाल्यामुळे सोहळ्यास अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले होते. महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती दीडशेच्यावर युवकांनी आपला परिचय दिला दरम्यान या सर्वांचे नाव आणि परिचयासह फोटोसह माहिती पुस्तिका बनवून त्याचे प्रचार प्रसार होणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले परिचय मेळावा यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष पंजाब काळे पुरुषोत्तम मोहेकर तेजस्वी कबले कार्याध्यक्ष मधुकर मोरझडे कोषाध्यक्ष राजेश घुक्से सचिव दिनेश खेकाळे सहसचिव गजानन बेले परमेश्वर मोरे रामप्रसाद उघडे संतोष तडसे कैलास बोंबले सुखदेव फोपसे संजय बुरकुले गजानन डाखोरे लक्ष्मण पांडे संजय चिरंगे अनिल धुमारे उध्दव धोंगडे संतोष वाडगे देवराव मुरमुरे संतोष डाखोरे सुरेश इंगळे कासीनाथ खरवडे सुरेश बोके कुमारी ज्योती लोखंडे मधुकर वैद्य नारायण सोनुळे विनोद मिराशे काशिनाथ धुमाळे आदींनी परिश्रम घेतले.



