कवी मुकुंद पांडे यांच्या ‘प्रतिबिंब भावनांचे ‘ या काव्यसंग्रहाचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हिवरा संगम येथे प्रकाशन!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महागाव तालुक्यातील एच.ई.एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिस्तप्रिय सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक, पत्रकार, लेखक,सुप्रसिद्ध कवी मुकुंद सुभाष पांडे यांच्या ‘प्रतिबिंब भावनाचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर २०२३ रोजी महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एकवीरा देवीच्या प्रांगणात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विदर्भ कवी नीलकृष्ण देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम, प्रमुख पाहुणे गजाननभाऊ वाघमारे संपादक लोकचिंतन साप्ताहिक, डॉ. धोंडेराव बोरुळकर, शरद पाटील उपसरपंच , राजूभाऊ धोतरकर ग्रामपंचायत सदस्य , मोरेश्वर पांडे हिवरा शिक्षण संस्था अध्यक्ष, बालाजी घाडगे मुख्याध्यापक, भगवानराव फाळके अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ, प्रमोद रायपूरकर पुसद, विजयराव बोंपीलवार ज्येष्ठ पत्रकार,यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी कवी मुकुंद पांडे यांचा मित्रपरिवार व सन १९९८ एच. ई.एस हायस्कूल मधील दहावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व आई एकविरा देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुण्याच्या स्वागतानंतर प्रतिबिंब भावनांचे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी गजानन वाघमारे , विलासराव कवाने, विजयराव बोंपीलवार, साहेबराव पाटील कदम,एस.टी. भगत,बालाजी घाडगे, विनय पांडे, प्रमोद रायपूरकर, प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष विदर्भ कवी नीलकृष्ण देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले तर योगेश राजे, संजय कोरटकर,दादाराव कदम, जोशी सर, अनिल चव्हाण, संजय ताकतोडे, खंडेराव कदम, गणेश भोयर, महागाव पत्रकार महासंघाचे अध्यक्ष, विनोद कोपरकर, अमोल राजवाडे, भगवानराव फाळके, राजू गिरी सुनील चव्हाण, महेश कामारकर, अनिल बोंपीलवार, भगवानराव बोंपीलवार, सुधाकर जामकर, रवींद्र कोंढोलीकर, अशोकभैया जयस्वाल,आशिष गावंडे,सुभाष आंडगे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते .
तर सदर कार्यक्रमासाठी सर्व मेहनत व प्रतिबिंब भावनांचे या काव्यसंग्रहाचा पूर्ण खर्च करून गुरु प्रति कृतज्ञता म्हणून गुरुदक्षिणा देणारे १९९८ दहावी बॅचचे अभय बोंपीलवार, अल्केश अल्केश अडकिने, प्रशांत इंगळे, प्रवीण बोंपीलवार, अशोक पोटे, कृष्णा कदम, आसिम अकबानी, सदानंद कदम, प्रमोद शेळके, मुकेश कदम, दयानंद राठोड, जालिंदर, यांच्यासह अनेक माझी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते महागाव तालुक्यातील हिवरा संगम सारख्या ग्रामीण भागात वास्तव्य असणाऱ्या मुकुंद पांडे यांनी हजारो कवितांचे लिखाण केले असून हिवरा संगम सारख्या ग्रामीण भागातील एखाद्या कवीने पुस्तक प्रकाशन करणे हा क्षण हिवरा अभिनंदनची ही गोष्ट आहे त्यामुळे कवी मुकुंद पांडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षा केल्या जात आहे या कार्यक्रमाचे संचालन अभय बोंपीलवार, तर प्रास्ताविक अल्केश अडकिने, तर आभार सचिन लिमजे यांनी केले.



