ईतर

मांडवा येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी!

पुसद: तालुक्यातील मांडवा येथे क्रांतिसुर्य , बिरसा मुंडा यांची १४८वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे क्रांतिसूर्य, बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती व ग्रामपंचायत कार्यालय मांडवा यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस पाटील दत्तराव पुलाते, तर प्रमुख पाहणे महादेव डोळस,ग्रामविकास अधिकारी एस.टी.तडसे, श्री सत्यसाई सेवा समिती पुसद अध्यक्ष डॉ.संदीप चव्हाण,माजी सरपंच शिवाजी चिरमाडे,माजी उपसरपंच नागु टेकाळे,नामदेव आबाळे,रमेश ढोले, हरिभाऊ धाड,नामदेव राठोड,कैलास राठोड,आशासेविका देविका साखरे हे मान्यवर उपस्थित होते.

या उपस्थित मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर बिरसा मुंडा या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.टी. तडसे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पठारे यांनी केले तर आभार जामुंतराव चिरमाडे यांनी मानले.यावेळी पंडित भेनिये,नामदेव घावस,पांडुरंग चिरमाडे, ज्ञानेश्वर साखरे ,नयन आडे,नितीन चिरमाडे, नामदेव साखरे,अंकुश घावस,मारोती फोपसे,समाधान चिरमाडे, भगवान चिरमाडे, संजय घावस,अश्विन चिरमाडे, गोपाल साखरे, अविनाश फोपसे, करण घावस,नितीन कांबळे,राहुल जाधव,सर्व ग्रा.पं. सदस्य ,ग्रा.पं .कर्मचारी प्रदुमन आबाळे, शेषराव जाधव,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close