ईतर

राजस्थान मंडळ चे दीपावली मिलन व अन्नकूट उत्साहात संपन्न;१३०० समाजबांधवांची उपस्थिती!

पुसद :राजस्थान मंडळ पुसद च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अग्रवाल मंगल कार्यालयात अन्नकूट व दीपावली मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला सकाळी ९ वाजेपासून लहान्यांनी वरिष्ठांचे आशीर्वाद घेतले.राधाकृष्ण मंदिरात राजस्थान मंडळाचे सचिव एड.विनोदकुमार पनपालीया यांनी सपत्नीक भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक आरती करण्यात आली. आरती नंतर राजस्थानी समाज बांधवांसाठी अन्नकूट प्रसाद ला सुरुवात करण्यात आली. दिवाळीनिमित्त समाजातील प्रत्येकापर्यंत गोड जेवण पोहोचवण्याच्या उदिष्टाने अत्रकूट ची परंपरा राजस्थान मंडळ राजस्थानी समाजासाठी पार पाडत आहे.

पारंपारिक राजस्थानी व्यंजन अन्नकूट प्रसाद मध्ये देण्यात आले होते. ह्या कार्यक्रमासाठी समाजातील सर्वजण मदत करीत असतात. अन्नकूट स्थळी कोणताही पदार्थ व्यंजन वाया टाकु नये च्या सुचना देण्यात येत होत्या. जेणेकरून अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात आली. अन्नकूट व दीपावली मिलन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नरेंद्र मानका कैलास अग्रवाल, गोविंद वर्मा, दिलीप ईनाणी,हरीष (मुन्ना) हेडा, कैलास बोरा, विनोद मालु, मुकेश जांगिड

बाबुलालजी गडवाल, गणेश अग्रवाल तसेच राजस्थान मंडळ चे अध्यक्ष चंद्रकांत गजबी यांच्या मार्गदर्शनात कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले तसेच राजस्थानी महिला मंडळ, माहेश्वरी संघटन, अग्रवाल मंडळ,राजस्थानी ब्राह्मण पंचायत, जांगिड समाज, अ. भा. मारवाडी युवामंच शाखा पुसद चे सहभाग प्राप्त झाले.कार्यक्रमासाठी अग्रवाल मंगल कार्यालय समाज बांधवांन साठी श्री.गिरीश अग्रवाल यांनी निशुल्क उपलब्ध करुन दिले. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ न देता नियोजन करण्यात आले होते. अशी माहिती रुपेन्द्र अग्रवाल , राजस्थान मंडळ पुसद यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close