ईतर

पुसद च्या किसान मार्केट यार्ड चा महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक;पुसद च्या विकासात मानाचा तुरा..

पुसद : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तण स्मार्ट प्रकल्प योजने अंतर्गत राज्यातील खाजगी बाजाराची सन २०२२-२३ या वर्षांची क्रमवारी पणन संचालनालय पुणेद्वारे नुकतीच यादी प्रकाशीत करण्यात आली असून उद्योजक गिरीश सत्यनारायण अग्रवाल यांच्या किसान मार्केट यार्ड यास द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे.

या निवडीबद्दल गिरीश अग्रवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर निवड ही राज्यातील ८० खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मधुन झालेली आहे. गिरीश अग्रवाल यांनी मागील १२ वर्षापासून खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या अंतर्गत वेळो वेळी योग्य पध्दतीने बदल करुन संपुर्ण बाजार समितीचे कायापालट करण्यात आले. सुट्टीचे दिवस वगळता किसान मार्केट यार्ड शेलू प्रत्येक दिवशी बाजार समिती अखंडपणे सुरळीत सुरु ठेवण्यात आले. वेळेचे बंधनात हरास करून कमीत कमी वेळेत कास्तकारांना मुक्त करणे. हरास करतांना उभ्या वाहनातच मालाची ग्रेडींग किंवा प्रतवारी करणे व त्याच ठिकाणी हर्रासी द्वारे शेत मालाचे भाव जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्याचे निश्चित करणे. त्यामुळे कास्तकारांचे कमी वेळ कमी नुकसान व लवकर शेतकन्याला निर्णय घेण्यास योग्य वेळ मिळाल्यामुळे मालाचे योग्य भाव प्राप्त करु शकतो. या करिता किसान मार्केट यार्ड तत्पर सेवा प्रदान करते. तसेच शेतकरी बांधवाच्या शेतमाल माल प्लेट काटाद्वारे काटा घेवून थेट खरेदीदाराच्या शेतावर ढिगावर गाडी खाली होणे व गाडीमध्येच खुले माल आणल्यास सुध्दा त्याची संपुर्ण सुविधा तत्पर देणे व गाडी खाली करणे. गाडी काटा झाल्या बरोबर लगेच शेतमालाची मार्केट पट्टी हिशोबासहीत लगेच संगणीकरण पध्दतीने दिली जाते. शेतकरी बांधवांना मिळालेली हिशोब व पट्टी होवून पेमेंट कॉउन्टरजवळ गेल्यास लगेच त्याला नगद चेक आरटीजीएसची मागणी होईल, त्या प्रमाणे त्याचे चुकारे लगेच केले जातात. शेतकरी बांधवांना शेतमालावर शेतमालावर मार्केट खर्च व्यतीरिक्त कोणतेही अवांतर खर्च लागत नाही. व हिशोब पट्टी नुसार १०० टक्के चुकारे देण्यात येतात. शेतकरी बांधवासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामध्ये शेतकरी भवन व निवास, हमाल गृह,भवन व निवास महिलासाठी स्वतंत्र निवास,शिदोरी निवास, उपहार फिल्टर थंड पाण्याची व्यवस्था, प्रसादन गृह, जनवारासाठी पिण्याची सुरक्षतेसाठी व्यवस्था. सि.सी. टीव्ही कॅमेरे व व्हॉट्सअप द्वारे रोज शेतकरी बांधवांना खरेदीचे मार्केट भाव पाठविण्यात येते.शेतकन्यासाठी धान्य प्रतवारी यंत्र वचाळणी सुविधा उपलब्ध आहे.शासनाचे हमी भाव खरेदी केंद्र,नाफेड व महाराष्ट्र राज्याची सुध्दा हमीभाव खरेदी केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहे. याबाबतअभिमानाने सांगतांना गिरीश अग्रवाल म्हणाले की, येथे कोणतेही छुपी खर्च नाही.काटा कॉम्प्युटरराईड असल्यामुळे कोणतेही नुकसान नाही. झाडु मारण्याची कोणतेही पध्दत नसल्यामुळे या ठिकाणी अडत लागत नाही. शेतकरी बांधवाचे हे सर्व अवांतर खर्च अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष फायदा करून देते असे अग्रवाल म्हणाले.किसान मार्केट यार्ड मध्ये दरवर्षी एक लाख क्विंटल पेक्षा जास्त धान्य शेतकऱ्यांन कडून खरेदी केली जाते.

 

सर्वांच्या सहकार्यामुळेच द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त , सदैव शेतकऱ्यांना त्याच्या धान्याचा योग्य मोबदला देण्यात येतो : गिरीश अग्रवाल

किसान मार्केट यार्ड शेलु यास स्मार्ट प्रकल्प योजने अंतर्गत खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमधुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात एकुण ८० खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमधुन द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या बद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. हा पुरस्कार मिळण्याच्या पाठीमागे सर्व शेतकऱ्याचे योगदान आहे. तसेच याचे श्रेय शेतकरी बांधव, कर्मचारी वर्ग, हमाल वर्ग, खरीतदार, आडते,व आपल्या सर्वाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी असल्याचे गिरीश अग्रवाल यांनी सांगीतले. आमच्यावर विश्वास दाखविला आहे त्याचीच ही आपल्या सर्वांसाठी व पुसद तालुक्यासाठी यशाची पावती आहे असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close