ईतर

राजस्थान मंडळ पुसद द्वारा कोजागिरी महोत्सव संपन्न;राजस्थान प्रीमिअर लीग चे यशस्वी आयोजन.

पुसद : राजस्थान मंडळ पुसद द्वारा शहरातील अग्रवाल मंगल कार्यालय येथे कोजागिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे शरद पौर्णिमेच्या पावन पर्वावर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये माती (क्ले) पासून बांसुरी व मटकी बनवणे, स्वयं परिचय करणे, भगवान श्रीकृष्णाचे जास्तीत जास्त नाव लिहिणे, मनोरंजनात्मक प्रस्तुती करण्यात आली तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

व राजस्थान समाजातील विशेष पदावर नियुक्त, पुरस्कार प्राप्त, विभिन्न प्रतिष्ठित पदावर नियुक्त समाज बांधवांचा शाल ,श्रीफळ, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मंचावर राजस्थान मंडळ पुसद चे अध्यक्ष चंद्रकांत गजबी, सुनीलकुमार मानका (हिंगोली), राधेश्याम शर्मा, विजय भांगडे, रवी काबरा, शिल्पा गट्टानी उपस्थित होते.

कोजागिरी महोत्सव निमित्त अमित चांडक यांच्या संकल्पनेतून राजस्थान प्रीमियर लीग चे दोन दिवसीय क्रिकेट सामने पॉलिटेक्निक कॉलेज च्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये समाजातील जवळपास 120 खेळाडूंनी सहभाग घेतला. क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच संकेत शर्मा, बेस्ट बॉलर शुभम राठी, बेस्ट बॅट्समन रवी शर्मा, मॅन ऑफ द सिरीज अमित चांडक यांना देण्यात आले. राजस्थान प्रीमियर लीग च्या अंतिम सामन्यात पवन शर्मा यांचा संघ विजेता ठरला व अमित चांडक यांचा संघ उपविजेता ठरला. राजस्थान प्रीमियर लीग चे बक्षीस वितरण कोजागिरी महोत्सवात शील्ड व नगद राशी देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील मान्यवरांनी बक्षिसासाठी योगदान दिले. कोजागिरी महोत्सवात भगवान श्रीकृष्णाची आरती करून दूध प्रसाद वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अँड. विनोदकुमार पनपालिया यांनी केले.सन्मान चिन्ह स्व.वेदप्रकाशजी मानका यांच्या सृती मध्ये देण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजस्थान मंडळ पुसद चे सर्व कार्यकारणी सदस्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close