काळी ( दौ.) येथील वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक!

काळी ( दौ.) / प्रतिनिधी (संदीप ढगे) महागांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या काळी ( दौ.) येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कार्यालय विजेची दर्जेदार सेवा देण्यास अपयशी ठरत आहे. प्रशासनाचे नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यासह वीज ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. तर शेतकऱ्यांना सिंचन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कौडगांव शेत शिवारात गेल्या आठ-दहा दिवसापासून वीज नादुरुस्तआहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपत आहे. संबंधित कर्मचारी यांना वारंवार फोन करून सुद्धा वीज नादुरुस्ती कडे काना डोळा करत आहेत. व कनिष्ठ अभियंता मुख्यालय भेटत नसल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी आरोप करत कौडगांव शेतशिवारातील शेतातील वीज त्वरित दुरुस्त करा न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काळी (दौ.) परिसरातील शेतकऱ्यासह गोकुळ राठोड अंकुश राठोड शंकर राठोड शेरसिंग जाधव पिंटू गायकवाड नथू खंदारे उत्तम वैद्य रफिक डोसांनी देवसिंग जाधव बाबाराव चव्हाण विष्णू गोदमले विशाल सोनटक्के गजानन कोकरे दत्ता वायकुळे आदि मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.



