साथ फाउंडेशनचा नारीरत्न पुरस्कार सोहळा हा स्तुत्य उपक्रम –जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर!

हिंगोली /प्रतिनिधी (शिवाजी कऱ्हाळे ):येथे साथ फाउंडेशन आणि सेवासदन परिवाराच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला भगिनींचा नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नवरात्र उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी धनराज कदम व मीरा कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन सेवासदन येथे केले होते.
आपला घर संसार सांभाळून महिला विविध क्षेत्रांमध्ये आपले मोलाचे योगदान देत असतात. त्यांचे कुठेतरी कौतुक व्हावे, त्यांना पुढील कार्यास प्रेरणा मिळावी या हेतूने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अशा कार्यक्रमामुळे महिलांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल .साथ फाउंडेशनचा हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे असे मत जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर यांनी व्यक्त केले. सेवासदनच्या रूपाने धनराज कदम आणि मीरा कदम हे अतिशय पवित्र कार्य करत आहेत त्यांच्या कार्याच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे पापळकर म्हणाले.
डॉ.माधुरी देशमुख ,डॉ. स्वाती पवार ,डॉ. कांचन बगडिया, संगीता चौधरी, अश्विनी येंबल, ज्योती वाघमारे, डॉ. कल्याणी जाधव, संगीता मामडे, रोहिणी खर्जुले, विशाखा धुळे, वसुधा कानडे, रेखा उकंडे, अश्विनी महालनकर, सुवर्णा रामपुरकर आले. यांना नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अंजली माने, शारदा इंगोले , ज्योती कोथळकर, कमल भडंगे, डॉ. राधिका देशमुख, कविता इमडे, देशमुख ताई, शुभदा तांबिले यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रा. दुर्गादास साकळे उपस्थित होते . हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला जितेंद्र पापळकर यांची विशेष उपस्थिती होती.जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते सर्व महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीरा कदम यांनी केले. पुरस्कारार्थी महिलांनी साथ फाउंडेशन व सेवासदन परिवाराचे आभार मानले .या कार्यक्रमासाठी प्रकाशचंद्र सोनी, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. नामदेव कोरडे, दारव्हेकर कवी शिवाजी कऱ्हाळे ,बबन गाडे ,संजय मुसळे, माधव पोले, विजय मानकर ,केतन कंदी, गंगावणे, अरविंद कांबळे, जावळे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली माने यांनी केले. तर धनराज कदम यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी कऱ्हाळे, विलास कोल्हाळ, अमर गायकवाड, अमर साखरे, प्रज्ञा कदम, साक्षी गणगे,गौरव गणगे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवासदन मधील चिमुकल्यांनी डान्स सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली.



