ईतर

सवना येथील नवचंडी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी!

महागाव/प्रतिनिधी(संदीप कदम) अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवाने सध्या महागाव तालुक्यातील सवना नगरी फुलली आहे निसर्गाच्या सानिध्यात नवचंडी देवस्थान आहे प्राचीन काळी महिषासुराच्या वध केल्यानंतर विश्रांतीसाठी नऊ खंड फिरून विसावा घेण्यासाठी या निसर्गरम्य परिसरात नवचंडी माता प्रकटल्याचे सांगीतल्या जाते.

सवना येथुन उत्तरेस ३ की. मी. अंतरावर स्वयंभु प्रकटलेल्या नवचंडी मातेच्या नवरात्रोत्सवाला रविवार १५ ऑक्टोबरला प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान सकाळी ६ वाजता व सायंकाळी ६ वाजता नवचंडी मातेची आरती करण्यात येते. सकाळी होत असलेल्या आरतीसाठी परिसरातील हजारो भाविक सकाळी ५ वा. पासुन मनोकामना पुर्ण होण्यासाठी अनवाणी पायाने मातेच्या दर्शनासाठी रिघ लावत आहेत सर्व विश्वस्त मंडळ हे मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close