ईतर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुसदच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी!

पुसद: शहरातील महात्मा गांधी चौक येथे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला असे लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे लीगल सेल प्रदेश अध्यक्ष मा. ऍड आशिष देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मनोगतामध्ये जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते. आणि ही शिकवण आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिली. असे त्यांनी सांगितले.

तसेच पुसद नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी यांचे त्यांच्या स्वच्छतेच्या कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे लीगल सेल प्रदेश अध्यक्ष मा. ऍड आशिष देशमुख यांनी सत्कार व सन्मान केला. यावेळी कार्यक्रमाला साहेबराव ठेंगे , नाना जळगावकर , सुरेश धनवे , दीपक जाधव , अशोक बाबर , फहीम अहमद , माधव वैद्य , शाकिब शाह , नारायण कराळे , शामराव व्यवहारे , लक्ष्मीकांत जयस्वार , ऍड. विनोद पाटील , सिद्दिक लोहार , समाधान नरवाडे , डॉ. पदमवार , जयंत पाटील , प्रवीण पाटील , यशवंतराव पाटील , सय्यद सलीम , शेख शब्बीर , कैलास मुकेश , सरफराज जाटू , शिवाजी ठेंगे , सय्यद ताज , सय्यद अली , सय्यद सोहेल , सुधाकर धुळधुळे , बाबाराव खिल्लारे , मुनाफोद्दीन खतीब , दीपक अवचार , इम्रान पटेल , सय्यद नवाज अली , तेजस मुकेश आणि अनेक असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमाला हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close