ईतर

आदिवासी आरक्षणात घुसखोरी नको; आदिवासी विकास परिषद चे उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेद!

पुसद : आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय विरुद्ध तसेच आदिवासी समाजाच्या दरिद्री आणि अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेक सदन समाज घटक आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याविरुध्द जाहीर निषेध करण्यासाठी आणि सरकारला इशारा देण्यासाठी उप विभागीय अधिकारी पुसद मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आदिवासी समाजावर वर्षानुवर्ष अन्याय होत आहे आदिवासी समाज अद्यापही सक्षम झाला नाही आणि कुठलाही समाज येऊन आदिवासी आरक्षण पाहिजे म्हणून आरडाओरड करत आहे शिवाय काही समाज हे मुळात आदिवासी नसून सुध्दा स्वतःला आदिवासी म्हणून घेत आहे आदिवासी समाजाला करोडो रुपयांचा निधी असूनही अद्याप काही विकास झाला नाही नोकऱ्या लागत नाहीत म्हणून कित्येक आदिवासी युवक बेकार आहेत अजून हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला नाही आणि लगेच काही जातीचे लोक आदिवासींत आरक्षण द्या म्हणून मागणी करीत आहेत.

कुठल्याही जातीला आरक्षण द्या मात्र अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे अशी मागणी आ भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड सुनिल ढाले यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.काही जमाती अनुसूचित जमातीमध्ये नाही हे कित्येक वेळा मा सर्वोच्च नायालयाने निकाल देऊन सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार त्या जमातीला थारा देण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. पुरावे असूनही काही समाज जाणीवपूर्वक आदिवासी असल्याचे सांगत आहे आणि आरक्षण लाटन्याचे काम करत आहे असे झाल्यास आदिवासी समाजावर अन्याय होईल आणि सविधानाचा अपमान होईल या निवेदनाच्या माध्यमातून कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीत कदापी समाविष्ट करू नये ही विनंती करण्यात आली आहे.राज्यातील आजही आदिवासी समाज समाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक देष्टिकोनातून मुख्य प्रवाहात आला नाही, बहुतांश वाड्या – पाड्यावर आजही वीज – रस्ते, शिक्षण पोचले नाही. आणि अश्यातच धनदांडग्या जमाती आदिवासीत येण्यासाठी विविध मोर्चे आंदोलन करीत आहेत. मात्र सरकारने या जमातीसोबत राजकारणासाठी जातील द्वेश निर्माण करण्याचे काम करीत आहे. म्हणून सरकारला विनंती वजा इशारा समजून त्यांनी कोणत्याही जातीला आदिवासीमध्ये घुसखोरी करण्यास सक्त ताकीद देऊन सदर विषयावर आळा घालायचे काम करावे अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन उभे करण्याचे करण्याचा इशारा पुसदच्या आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष अँड सुनिल ढाले,रामकृष्ण चौधरी,नारायण कऱ्हाले,गजानन टारफे,शीतल ढगे,गणपत गव्हाले,देविदास डाखोरे,किसन भुरके,संतोष गारुळे,अँड बालाजी उघडे, अँड किसन कोटुळे, अरविंद शेळके,तातेराव भडगे,नंदकिशोर आमले,शंकर इंगळे,दत्ता बोलके,अनिल इंगळे,संदीप आढाव,श्रीकांत मारकड,अविनाश शिकारे,केशव कुरकुटे,गणेश भुजाडे,ओमकार ढाकरे,श्रीकांत साबळे,करण वानोळे,अनिकेत ढगे,ऋषिकेश सुरोशे,चेतन असोले,अतुल बोंबले,कृष्णा आसोले,खुशाल बरगे,सत्यम धनवे,शुभम वाघमारे,पवन बहिरमकर,राजु गायकवाड ,कुलदीप साबळे सह शेकडो बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close