पैनगंगा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता

पुसद :तालुक्यातील पांढुर्णा केदारलिंग येथील मंदिरासमोरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रामध्ये दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान युवक पोहण्यासाठी गेला होता.पोहण्यासाठी गेलेला तरुण नदी पात्रातून बाहेर आलाच नाही.त्यामुळे तो युवक पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दोन तासापासून शोध कार्य सुरूच आहे.सुमीत शिवाजी आठवले वय ३५ वर्षे रा.कानेडखेड असे नदीपात्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे.तो कानेडखेड येथून पांढुर्णा (बु.) येथील केदारलिंग मंदिरामध्ये सोमवारी दर्शनाकरिता आला होता. त्यानंतर तो समोरच असलेल्या पैनगंगा नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता.परंतु पोहताना त्याला अंदाज न आल्याने बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.युवक नदीपात्रामध्ये बुडाल्याची माहिती कळताच गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून युवकाचे शोध कार्य सुरू ठेवले आहे.वृत्तलिहोस्तोवर तरुण बेपत्ता असल्याची समोर आली आहे.



