ईतर

गौळतिचा मारोती (राऊतवाडी) येथील यात्रेमध्ये हजारों भाविकांचा जनसागर!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):- तालुक्यातील राऊतवाडी येथील गौळतिचा मारोती मंदिर हे येथील प्रसिद्ध जागृत मारोती मंदिर येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य यात्रा भरली जाते यावर्षी शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ ला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरली होती परिसरातील व पंचक्रोशीतील हजारो सर्वधर्मीय भाविकांनी या प्रसिद्ध मारोतीचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती.

भक्तांच्या मनोकामना इथे पूर्ण होतात हे येतील आख्यायिका आहे तसेच जागृत देवस्थान म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे अनेक लहान बालगोपाल /स्त्री पुरुष यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात विविध अनेक प्रकारचे दुकाने यात्रेमध्ये येत असतात.

तसेच दर शनिवार सह हनुमान जयंतीला अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात नॅशनल हायवे लगत असणाऱ्या काऊरवाडी येथून हे देवस्थान अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे साधारण १२५ वर्षापासून एका वट्यावर मारोतीची मूर्ती होती त्या ठिकाणी आता भव्य असे मंदिर व सभा मंडप उभारण्यात आले असून मंदिर परिसरात लावलेल्या विविध वृक्षांनी मंदिर परिसर भाविकांनाअतिशय प्रफुलित करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close