ईतर

वनविभागाच्या चेक पोस्ट जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात!

पुसद: वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील येत असलेल्या येलदरी घाटातील वनविभागाच्या चेक पोस्ट जवळ दोन दुचाकींचा समोरासमोर धडक मारल्याने भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दि.१० सप्टेंबरच्या पाच वाजता दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार वाशिम कडून पुसद कड़े येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच- २९सिए०५२४ तर पुसद कडून वाशिम कडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच-२९एस २३८४ या दुचाकींची समोरासमोर विशाल धडक बसून दोन्ही वाहनावरील चालक व सहकारी गंभीर जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना त्वरित पुसद येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात तर काही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसंत नगर पोलिसांना माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या भीषण अपघातात रोहडा येथील अमोल मारोती मस्के वय २५ वर्ष हा गंभीर जखमी झाला असून याच्या डोक्याला जबर मार लागला आहे याला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातून यवतमाळ करिता रेफर करण्यात आले. तर या दुचाकी वरील याचा सहकारी विकास सुभाष कांबळे वय २४ रा. रोहडा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तर दुसऱ्या वाहनावरील जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. वसंत नगर पोलीस स्टेशनचे सुदाम आडे, डीबी पथकाचे अशोक चव्हाण, संजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ त्वरित गाठले घटनेचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close