ईतर

कै.बाबुराव पाटील महाविद्यालयात कुस्ती स्पर्धा संपन्न!

हिंगोली/ प्रतिनिधी(शिवाजी कऱ्हाळे): येथील ज़िल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा दि.२१ ऑगस्ट २०२३  रोजी प्रथमच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालयीन कुस्ती परभणी -हिंगोली विभागाच्या (डी झोन) स्पर्धा कै बाबुराव पाटील महाविद्यालय आयोजित संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन मा.आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर( संस्था अध्यक्ष), यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयवंत भोयर , उपस्थित मान्यवर श्री. राजेश्वर मारावार ज़िल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली,,श्री बेंगाळ भास्करराव, श्री. उल्हास पाटील, विश्वाम्बर अप्पा ,डी झोनचे चेअरमन डॉ. मीनानाथ गोमचाळे डॉ. देवकते , डॉ. चंद्रकांत सातपुते, पवन उपाध्याय, गजानन पाटील गोरेगावकर रंगनाथ पाटील . शेख नफीस पहेलवान, प्रा.डॉ दिनकर हंबर्डे,डॉ. नागनाथ फड, प्रा. अरुण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.कुस्ती स्पर्धेमध्ये परभणी व हिंगोली या डी झोन च्या महाविद्यालयाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. ५० खेळाडूंनी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवला. विजयी संघ प्रथम शिवाजी महाविद्यालय हिंगोली, द्वितीय नानासाहेब घाडगे महाविद्यालय दैठना, तृतीय नागनाथ महाविद्यालय औंढा विजेतेपद चॅम्पियनशिप चषक देऊन गौरविण्यात आले व वैयक्तिक गटात खेळाडूंना सुवर्णपदक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. बक्षीस वितरण प्रसंगी प्राचार्य डॉ. जयवंत भोयर,गणेश लुंगे,भगवान काचगुंडे,अण्णा डिगोळे,क्रीडा अधिकारी बोथीकर व बसी सर कऱ्हाळे सर आदींची उपस्थिती होती. विविध वजन गटात एक ते तीन क्रमांकाचे विजयी खेळाडू५७कीलो प्रथम नवनाथ बोराटे शिवाजी महाविद्यालय हिंगोली, द्वितीय वनी पाटील कै. रमेशराव वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ, तृतीय आशीर्वाद खिल्लारे नागनाथ महाविद्यालय औंढा ६१कीलो प्रथम अरफाज शेख नागनाथ महाविद्यालय औंढा, द्वितीय शंतनू बेले,बहिर्जी महाविद्यालय वसमत, तृतीय दीपक नेजे संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड ६५ कीलो प्रथम सागर कदम केके एम महाविद्यालय मानवत , द्वितीय अल्ताफ पठाण शिवाजी महाविद्यालय हिंगोली, तृतीय आदित्य रहाटे तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव ७० कीलो प्रथमअविनाश जाधव, आदर्श महाविद्यालय हिंगोली, द्वितीय सोनटक्के हनुमान संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड तृतीय अभिषेक हरकळ नितीन महाविद्यालय पाथरी ७४कीलो प्रथम हनुमंत भूतनर शिवाजी महाविद्यालय हिंगोली, द्वितीय विजय चव्हाण नानासाहेब घाडगे महाविद्यालय देठणा तृतीय राजेश कदम हुतात्मा बहिर्जी महाविद्यालय वसमत ७९कीलो प्रथम पाटील अनुप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव द्वितीय श्रीकांत गिरी नितीन महाविद्यालय पाथरी तृतीय शिवाजी मगर हुतात्मा बहिर्जी महाविद्यालय वसमत ८६ कीलो प्रथम सतीश भुमरे नानासाहेब घाडगे महाविद्यालय देठना, द्वितीय लक्ष्मीकांत जयस्वाल शिवाजी महाविद्यालय हिंगोली, तृतीय कुरील सौरव तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव ९२कीलो  प्रथमस्वप्निल सावळे शिवाजी महाविद्यालय हिंगोली  परभणी व हिंगोली जिल्ह्यातील विविध तालमीतील ग्रामीण भागातील प्रेक्षक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ. साहेबराव देवकते डॉ. विठ्ठल डुमनर डॉ. चंद्रकांत सातपुते डॉ. आनंद भट डॉ. संदीप लोंढे डॉ. पवन पाटील डॉ. गुणाजी नलगे शेख नफीस पैलवान भालचंद्र रणसूर,दत्तराव खंदारे, प्रा. कल्याण पोले, विजय जाधव, गजानन पवार आदींनी काम पाहिले, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेतने खंदारे साखरे,कांबळे, अर्जुन आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close