ईतर

देशभक्तीपर गित गायन स्पर्धेत विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलचा प्रथम क्रमांक!

पुसद : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापनदिनी पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थान यांनी आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते, आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भावी पिढी आहेत, त्यांच्या मनामध्ये देशाभिमान जागृत व्हावा या उदात्त हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती यामध्ये पुसद मधील बऱ्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल पुसदच्या विद्यार्थ्यांचा अ गटामध्ये *प्रथम क्रमांक* आला. शाळेतील ज्येष्ठ संगीत शिक्षक श्री कमलेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नियमित संगीताचे धडे दिले जातात, त्याचीच प्रचिती या गीत गायन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी दिली. अतिशय उत्कृष्ट देशभक्तीपर गीत गाऊन प्रथम क्रमांक पटकाविला. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय घेऊन कार्य करणाऱ्या पोदार लर्न स्कूल पुसद येथील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट देशभक्तीपर गीत सादर केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शरद मैंद, सचिव श्री सुरज डुबेवार, उपाध्यक्ष श्री संतोष अग्रवाल, कोषाध्यक्ष श्री मनिष अनंतवार, सहसचिव श्री संगमनाथ सोमावार, प्राचार्या सौ अनुपमा भट देशमुख व सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close