पुसद शहरात विविध शासकीय कार्यालयात ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा!

पुसद: शहरात ७७ वा स्वातंत्र्य वर्धापनदिन महसूल विभागाच्या वतीने शासकीय ध्वजारोहण सोहळा तहसील कार्यालयावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पुसद येथील उपविभागीय अधिकारी, एकनाथराव काळबांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस पथक तथा गृहरक्षक दलांच्या वतीने तिरंगा ध्वजाला मानवंदना देऊन सलामी देण्यात आली. तसेच सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी एकनाथराव काळबांडे, पुसद नगर परिषदेचे मुख्य प्रशासक, तथा मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, तहसीलदार महादेव जोरवर, परीक्षाविधीन तहसीलदार पल्लवी आखरे, निवासी नायब तहसीलदार जी. एन. कदम, नायब तहसीलदार व्ही जी इंगोले, नायब तहसीलदार आर के तुपसुंदरे, नायब तहसीलदार आर.एम. शेख,
पुसद पंचायत समिती चे गटविकास अधिकारी संजय राठोड, उप अभियंता, सतीश नांदगावकर, शाखा अभियंता सिरसागर, पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेशरकर, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती,
स्वातंत्र्याचा हा ७७ वा वर्धापन दिन आपण सर्वांनी मिळुन एकजुटीने साजरा करून या व भारत देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे सहकार्य केल्यास भारत निश्चितच महासत्ता बनेल असे गौरव उद्गागार उपविभागीय अधिकारी एकनाथराव काळबांडे यांनी शुभेच्छा पर बोलताना केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषटवार विद्यालयाचे शिक्षक, राजेश कोटलवार यांनी केले.तर आभार नायब तहसीलदार जी. एन.कदम, यांनी केले या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तथा विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडिया तथा प्रिंट मीडियाचे पत्रकार प्रतिनिधी, पोलीस पथक, गृहरक्षक दल,सेवानिवृत्त माजी सैनिक, तथा विविध क्षेत्रातील मान्यवर महिला व बालक इत्यादीची या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती होते.
पुसद पंचायती समिती कार्यालयात गटविकास अधिकारी संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा ध्वजाला मानवंदना देऊन सलामी देण्यात आली. तसेच सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेण्यात आले. यावेळी समस्त पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी गुटखा तंबाखू खाणार नाही व आपला परिसर स्वच्छ ठेवला जाईल अशी शपथ घेतली
यावेळी या कार्यक्रमाला पुसद पंचायत समितीचे समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते.
तर वन विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिना निमित्त १५ ऑगस्ट रोजी मारवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल झांबरे यांच्या नेतृत्वात खंडाळा घाटात ग्रीन तिरंगा मोटर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ग्रीन तिरंगा मोटर सायकल रॅली मध्ये मारवाडी वनपरिक्षेत्र मधील अधिकारी, कर्मचारी वनमजूर, महिला कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता.
यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वनसंरक्षण वनसंवर्धन संदेश दिला या रॅलीची मारवाडी पासून खंडाळा पर्यंत नागरिकांनी प्रशंसा केली आणि वृक्ष संवर्धन झाडे लावा झाडे जगवा शपथ घेतली



