काळी ( दौ.) येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा!

काळी (दौ)प्रतिनिधी (संदीप ढगे) :संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होऊन ही आदिवासी समाज मागासलेला असल्याचे आढळले त्यामुळे १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. म्हणून ९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काळी (दौ.) येथे भगवान बिरसा मुंडा उत्सव समितीच्या वतीने महात्मा मुंगसाजी माऊली संस्थानाच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे व महात्मा मुंगसाजी माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हंसराजभाऊ मोरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर श्रीनिवास भाऊ मोरे यांनी संघटनेबद्दलचे महत्त्व पटवून दिले. यावेळी सहपत्नीक सरपंच सौ निशाताई संतोष राठोड उपसरपंच सौ सविता दिगंबर पठाडे मा सरपंच परमेश्वर आगोशे ग्राम .प .सदस्य शारीक भाई रत्नकला साखरकर जीवन वारकर नयन ठाकरे अमोल बगाटे नथु आढाव देवानंद आंबोरे नितीन शेळके आदि उपस्थित होते. यावेळी मणिपूर राज्यात आदिवासी महिलावर झालेल्या अमानवीय अत्याचाराचा नारे देऊन निषेध करण्यात आला. रवींद्र पठाडे नितीन वैद्य भगवान देवकर नागेश झिंगरे यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप बंडू ढगे यांनी केले.



