ईतर

पुसद एमआयडीसी मध्ये पाण्या अभावी उद्योग ठप्प;, एमआयडीसी प्रशासनाने फसवणूक केल्यामुळे गुन्हे दाखल करण्याची उद्योजकांची मागणी!

पुसद: येथील एमआयडीसीमध्ये लघुव्यवसायांच्या माध्यमातून काही सुशिक्षित युवकांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी बँकांचे कर्ज उचलून उद्योग सुरू केले आहे परंतु एमआयडीसी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाण्याअभावी हे उद्योग काही दिवसापासून ठप्प पडल्याने या उद्योजकावर कर्जाचा डोंगर उभा राहण्याची शक्यता नाकारता येत असुन या  उद्योजकांनी चक्क ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून एमआयडीसी प्रशासनाने या लघु व्यवसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद येथील ‘एमआयडीसी’मधील भुखंडांपैकी काही भुखंडांवर मोजके उद्योग सुरू झाले आहेत.तथापि, उद्योगांची संख्या वाढल्यास शहरातील अनेक बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळणे शक्य आहे. त्यासाठी उद्योजकांना लागणाऱ्या विद्यूतची सोय असली तरी सर्वांत मोठी असलेली पाण्याची समस्या मात्र अद्याप सुटली नाही. परिणामी, मोठे उद्योजक याठिकाणी उद्योग उभारण्यास तयार नाहीत एमआयडीसी प्रशासनाने करारानुसार लघुउद्योजकांना २४ तास अखंडित पाणी व विज पुरवठा करणे बंधनकारक असताना मात्र एमआयडीसी प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दिरंगाई करत असून एमआयडीसी प्रशासन जाणीवपूर्वक लघु उद्योजकांची हेळसांड करीत आहे . एमआयडीसी मध्ये गेल्या दि.२५ जुलै २०२३ पासून हे उद्योग पाण्याअभावी ठप्प झाले आहेत. त्यामुळे या उद्योजकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असुन या एमआयडीसी मधील सर्व लहान सहान उदोजकांनी आपले उदोग सुरू करण्यासाठी बँक मधून कर्ज काढून हे उद्योग सुरु केले आहे. जर उद्योग बंद असेल तर उत्पादन होणार नाही. त्यामुळे आर्थिक आवक होणार नाही त्यामुळे उदोजक हे नियमित बँक चे हप्ते भरू शकणार नाही. व हे उदोजक हा कर्ज बाजरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही व ते उद्योजक मानसिक त्रासमुळे व कर्जामुळे आत्महत्या सुद्धा करू शकतो. परंतु या सर्व बाबीकडे एमआयडीसी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यातच एमआयडीसी मधील कामगार व कर्मचारी यांना पाणी पिण्यासाठी व घरगुती काम करण्यासाठी मिळत नसल्यामुळे पुसद एमआयडीसी मधील शेकडो कामगार व कर्मचारी स्थालारीत होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उदोजकांचे दररोज लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने या लघु उद्योजकांची करारनाम्यानुसार फसवणूक केल्याने या उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात थेट ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे तक्रार दाखल केली असून एमआयडीसी प्रशासने फसवणूक केल्यामुळे त्यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close