ईतर

पुसद शहरात आमदार तीन मात्र रिंग रोडचा प्रश्न नागपूर येथील आमदाराने विधानपरिषदेत केला उपस्थित!

पुसद: शहराला सत्ताधारी पक्षाचे एक खासदार तर एक लोकनियुक्त आमदार व दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार असून सुद्धा या मतदार संघात विकासाचे तीन तेरा, वाजले असुन विकासाची पाटी कोरीच आहे. या आमदार खासदारामुळे मतदारसंघातील जनता त्रस्त असून लोकप्रतिनिधी मस्त, अधिकारी सुस्त आहेत.मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षात या तालुक्याच्या विकासाच्या नावावर अन्यायच होत आहे. हा तालुका नेहमी विकासापासून वंचित रहात आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी आपल्या शहराला तीन आमदार लाभल्याने शहराचा विकास झपाट्याने होणार या आशा भोळ्या भाबड्या जनतेत होती. मात्र शहरासह तालुक्यात एकही विकास काम सुरू झालेले नसल्याने जनतेच्या आशा आकांशावर पाणी फिरले आहे.मागील कित्येक वर्षापासून या शहरातील रिंग रोडचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. परंतु या पावसाळी अधिवेशनात रिंग रोड बाबत या शहरातील एकाही लोकनियुक्त आमदार किंवा विधान परिषद सदस्य यांनी प्रश्न उपस्थित केला नाही विशेष म्हणजे या शहरातील रिंग रोडचा प्रश्न नागपूर येथील आमदार प्रविण दटके यांनी विधान परिषदेमध्ये लावून धरल्याने पुसद मतदार संघातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद शहराच्या बाजूने जाणारा रिंग रोडसाठी निधी मिळावा म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक बाबर यांनी सा.बां. विभाग व राज्यशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून २०२३ च्या पुरवणी बजेट मध्ये रिंग रोडसाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी १५ कोटी मंजूर करण्यात यावी याकरिता विधानपरिषदेमध्ये आमदार प्रविण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नास शासनाने माहिती दिली. कार्यकारी अभियंता पुसद चिफ इंजिनिअर अमरावतीचे जोशी यांच्या मार्फत पुसद रिंग रोडच्या कामासाठी बजेट मध्ये तरतूद करावी म्हणून राज्यशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंजूरात मिळण्यासाठी आमदार प्रविण दटके यांनी विधानपरिषदेमध्ये प्रश्न विचारला आणि शासनाने १५ कोटी ची तरतूद केली. महाराष्ट्रातील अनेक आमदारांना विकासकामासाठी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी घोषीत केला. त्यामुळे सरकार आर्थिक अडचणीमध्ये सापडल्यामुळे २५ कोटी रिंग रोडसाठी लागणार असून सध्या पहिला टप्पा म्हणून पहिला १५ कोटी मंजूर झाल्याचे अशोक बाबर यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग पुसदच्या प्रिया पुजारी, उपविभागीय अभियंता प्रकाश झळके, यवतमाळ ए. सी. धोत्रे या कामासाठी मदत केली तसेच आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांचेही अशोक बाबर यांनी आभार मानले. परंतु आपल्या शहरातील विकासाचा प्रश्न व मतदारसंघातील जनतेचा प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधीने न उठविल्याने मतदारसंघात या लोकप्रतिनिधी बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close