महागाव जवळील पुस नदीच्या पुलावर कंटेनर बंद पडल्याने ट्राफिक जाम: पुलावर एक फूट पाणी!

महागाव/प्रतिनिधी( संदीप कदम):-गुरुवारच्या रात्री दरम्यान झालेल्या ढग फुटी सदृश्य पाणी कोसळल्यामुळे तालुक्यात सर्वत्र नदी नाले दुथडी भरून वाहत आहे नॅशनल हायवे ३६१ महागाव येथील पुलावर सकाळपासून एक फूट पाणी साचून असून खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे एक कंटेनर या ठिकाणी बंद पडला असून दोन्ही साईटला वाहनाच्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.
महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत करत आहेत तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे नागरिकांनी दक्ष राहून पुलावरून धोकादायक प्रवास न करण्याचे आव्हान तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
महागाव येथील पुलावर मागील अनेक वर्षापासून मोठमोठे खड्डे पडले आहेत ते बुजवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने दिली त्याचा कुठलाही परिणाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर झाला नाही या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले असून आज या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे फुलावर कंटेनर बंद पडला त्यामुळे दोन्ही साईडलाही ट्राफिक जाम झाली-संजय कोपरकर- सामाजिक कार्यकर्ते महागाव,



