पुसद येथे मुलांनी पत्नीच्या मदतीने बोगस जमीन मालक दाखवून वडीलाची केली फसवणूक ;शहर पो.स्टेमध्ये पाचजणां विरुध्द गुन्हे दाखल! बोगस खरेदी-विक्रीचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयातील धक्कादायक प्रकार!

पुसद : तालुक्यातील नांदुरा ई, शिवारातील १ हेक्टर, ६२ आर एवढे क्षेत्र असलेली शेतजमीनीचे दुय्यम निबंधक कार्यालय पुसद येथे डमी खरेदीदार उभा करून बोगस खरेदीखत तयार करून हडप केल्याची फिर्याद मूळ शेतकऱ्याने शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती त्यावरून शहर पोलिसांनी दि.१० जुलै २०२३ रोजी दुपारी३:२४ वाजण्याच्या सुमारास मुलगा वसुनेसह पाचजणांना विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेले माहिती अशी की,जमिनीचे मूळ मालक सिताराम यमजी राठोड वय ७० वर्षे रा.पिंपळगाव (इ) यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दि.३ जून २०२३ रोजी फिर्याद दाखल केली होती.सिताराम यांच्याकडे तालुक्यातील नांदुरा (इ) येथे १ हेक्टर ६२ आर शेत जमीन आहे.ती शेतजमीन त्यांनी २०१३ मध्ये विकत घेतली होती. फिर्यादीला दि.१८ मे २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुसद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना सिताराम यांचा मुलगा अर्जुनकुमार व त्यांची सून विनिता यांनी संगणमत करून शेत जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार केले.त्यानंतर डमी बाप उभा करून व बक्षीस पत्राद्वारे मिळालेली शेत जमिनीचा बनाव करून परस्पर विक्री केली.यात विशेष बाब म्हणजे सिताराम यांनी त्यांच्या नातवाला बक्षीस पत्राद्वारे नावे करून दिल्याचा पुरावा दुय्यम निबंध कार्यालयामध्ये खरेदी विक्रीतील दस्तऐवजात जोडले होते. शेत जमिनीचे परस्पर विकल्याची माहिती फिर्यादीला कळताच आपली फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन येथे दि.३ जून २०२३ रोजी दाखल केली. व सोबतच पुसदच्या उपविभागीय अधिकारी पुसद,मंडळ अधिकारी व तालुका दंडाधिकाऱ्यांना सुद्धा दाखल करण्यात आली चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.त्यावर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून व दुय्यम निबंधक अधिकारी यांचे लेखी उत्तर घेतल्यानंतर तब्बल ३७ दिवसांच्या चौकशी नंतर फिर्याद मुलगा व सून विनिता अर्जुनकुमार राठोड वय ३२ वर्षे रा.नांदुरा (इ),मुलगा अर्जुनकुमार सिताराम राठोड यांच्यासह मांगीलाल भीवसींग चव्हाण,शंकर दगडू चव्हाण व एका अनोळखी व्यक्ती विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पुसद शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस जमिनीची बोगस विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे उघड होत आहेत.दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तलेखक यांच्याकडून पक्षकारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक सुरू असून यामुळे परवानाधारक दस्त लेखक यांच्यावर अन्याय होत आहे. या प्रकाराला सर्वस्वी दुय्यम निबंधकच जबाबदार असून याची सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी चौकशी करावी अशी मागणी जनतेतुन जोर धरत आहे.



