ईतर

बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीच्याअध्यक्षपदी श्याम पाटील तर उपाध्यक्षपदी ययाती नाईक यांची निवड!

पुसद:येथील सहकार क्षेत्रातील पुसद व परिसरातील शान असलेल्या बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष ची निवड नुकतीच पार पडली असून अध्यक्षपदी मनोहर नाईक यांचे निष्ठावंत श्याम पाटील तर उपाध्यक्षपदी पुनश्च माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दि.११जूलै रोजी बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूतगिरणीच्या सभागृहामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये माननीय मनोहरराव नाईक यांच्या गटाचे सर्व संचालक निवडून आल्यामुळे श्याम पाटील यांची एकमताने अध्यक्ष म्हणून तर ययाती नाईक यांची पुनश्च उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

काही दिवसांपूर्वी बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी ची निवडणूक झाली होती यापैकी केवळ सहा जागांची निवड झाली होती बाकीच्या जागा नाही गटाच्या अविरोध झाल्या होत्या तेव्हापासूनच अध्यक्ष व उपाध्यक्ष ची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते परंतु आता या तर्क वितरकांना विराम मिळाला असून मनोहर नाईक यांच्या अगदी जवळचे व सुमारे  २१वर्षापासून संचालक पदावर असलेले सेलू येथील श्याम पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष पद पुन्हा एकदा ययाती नाईक यांच्याकडे ठेवण्यात आलेल आहे. श्याम पाटील व ययाती नाईक यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्यानंतर लगेचच मावळते अध्यक्ष राजू आसेगावकर निघून गेल्याने थोडा वेळ चर्चेला उधाण आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close