ईतर

श्रीरामपूर ग्रामपंचायत येथे जागतिक योग दिवस उत्साहात साजरा!

पुसद: शहराला लागून असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या वतीने दि.२१जून २०२३ रोजी जगदंबा मंदिर परिसर येथे जागतिक योग दिवस आयोजित केला होता.यवतमाळ जिल्ह्यामधील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचातीला जिल्हा मधून योग दिवस साजरा करण्याचा मान मिळाला या योग दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत श्रीरामपूर येथील ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन फार चांगल्या प्रकारे योग दिवस साजरा केला. यावेळी उपस्थितांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद यवतमाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे साहेब, उदगम फाउंडेशन सचिव सोनल ताई ययाती नाईक, मोहिनी ताई इंद्रनील नाईक, विस्तार अधिकारी चंदनकर साहेब जि प यवतमाळ , माजी जिल्हा परिषद सदस्य ढबाले सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामपूर ग्रामपंचायत सरपंच आशिष काळबांडे हे होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड, ग्राम सदस्य दिनेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य राहुल सहारे, ग्रामपंचायत सदस्य सौ शोभा कलिंदर, ग्रा. सदस्य कावेरी टाकरस, ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योती कदम, ग्रामपंचायत सदस्य सौ रजनी वानखेडे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय वडते, बळीराजा चेतना अभियानाचे अध्यक्ष राजाराम राठोड, परेश पांगारकर, मधुकर कलिंदर व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यांना योगा शिकवण्याकरिता योगा प्रशिक्षक म्हणून रविकांत व्यंकटवार, झरकर सर, श्याम काटे, शीला मुनेश्वर, रंजना किनीकर, स्मिता नगराळे, वंदना लंकेपिल्लेवार, सीमा वैद्य, आशा माने, साक्षी कलिंदर, शितल चव्हाण, यांनी उत्कृष्ट प्रकारे गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच यावेळी मंचावर गीत गायन करणे करिता श्रीधर झरकर सर तबलावादक प्रशांत आत्राम व रूपक आत्राम गीत सादर करते.

नगराळे साहेब एम एस इ बी, या समूहांनी मंचावर गीत गायनाचा व ध्यान साधनेचा चांगल्या प्रकारे सादरीकरण केले तसेच या ठिकाणी पुसद तालुक्यामधील संतोष डाखोरे विस्तार अधिकारी व सर्वच विस्तार अधिकारी तसेच ग्राम सेवक संघटनेचे अध्यक्ष संजय हिंगाडे साहेब व सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी, तसेच पुसद पंचायत समितीचे सर्वच कर्मचारी व श्रीरामपूर ग्रामपंचायत कर्मचारी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोठ्या संख्येने गावकरी मंडळी महिला मंडळी विद्यार्थी व कर्मचारी वर्ग सदर कार्यक्रमाला उपस्थित असल्यामुळेच या कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आले. या नेत्रदीपक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चव्हाण व आभार प्रदर्शन श्रीरामपूर ग्रामपंचायत चे सचिव अनिल जी भगत यांनी केले. सदरू सोहळ्याची चर्चा सर्व जिल्ह्यात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close