बाबासाहेब नाईक सहकारी सुतगिरणीच्या निवडणुकीत मनोहराव नाईक यांच्या सत्ताधारी पॅनलची बाजी तर ‘विरोधाकाचा’ चा धुव्वा!

पुसद: महागाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या नाईक घराण्याचा गड असलेल्या बाबासाहेब नाईक सहकारी सुतगिरणीची मतदान प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर करण्यात आला. गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळपासून येथे नाईक घराण्याची एकहत्ती सत्ता आहे.त्यामुळे या सत्ताधाऱ्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा केले होते. तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी ठरणाऱ्या बाबासाहेब नाईक सहकारी कापूस उत्पादक सूतगिरणी पिंपळगाव ची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. २१ संचालक मंडळाकरिता ही निवडणूक जाहीर झाली होती. नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनोहर नाईक पॅनलचे ९ उमेदवार अविरोध निवडून आले होते. तर उर्वरित १२ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. कापूस उत्पादक मतदार संघ मधून ११ जागा तर इतर मागासवर्गीय मतदार संघ मधून १ जागा निवडून यावयाची होती. कापूस उत्पादक मतदार संघ मधून १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर इतर मागासवर्गीय मतदार संघ मधून २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. याकरिता १७ जून रोजी पुसद महागाव तालुक्यातील १० मतदान केंद्रावर मतदान पार पडले होते. मतमोजणी १८ जून रोजी येथील अग्रवाल मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या निवडणुकीत माजी मंत्री मनोहर नाईक पॅनलचे १२ ही उमेदवार विजयी झाले तर विरोधी वसंतराव नाईक शेतकरी आघाडी पॅनलच्या उमेदवारांचे या निवडणुकीत धुवा उडाला आहे. उमेदवारांना पडलेली मते निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सुनील भालेराव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल सुरपाम व निवडणूक निरीक्षक केशवराव मस्के सहाय्यक निबंधक दिग्रस यांनी जाहीर केले. यामध्ये उमेदवारांना मिळालेली मते १.आडे अमीत तुकाराम-१५८०,
२. आसेगावकर राजेश मधुकर-१५६७,
३.काळे गणपत ग्यानबा-१५७९,
४.गावंडे विलास बापुराव-१४४,
५. चवरे गजानन जगन्नाथ-१५५७,
६.जाधव संदिप बन्सी-१५६४,
७.डंगाले विलासराव राघोजी-१५५३,
८. देशमुख पंजाबराव रामराव-१५८,
९.नय्यंरखाँ कौसरखाँ-१५४५,
१०. पाटील दिलीप बाबाराव-१५७७,
११.पाटील (बेद्रे) दिलीप संभाजीराव-११८,
१२. पाचकोरे दिगांबर माणीकराव-१५३२,
१३. डॉ. महम्मद नदीम महम्मद रशिद-१२१,
१४.शिंदे अनिल दत्तराव-१२२,
१५. सोनी धनंजय गोवर्धनदास-१५३५,
१६. सईद बेग रशिद बेग मिर्झा-१५१६, अशी आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सुनील भालेराव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल सुरपाम, निवडणूक निरीक्षक म्हणून केशवराव मस्के, क्षेत्रीय अधिकारी उत्तम वानखेडे, गजानन तरासे, शिवाजी मगर मतमोजणी अधिकारी आर एस नवरे, मतमोजणी कर्मचारी शाम कोठुळे, राजेंद्र पाटील, राजेंद्र देशमुख व अनुरोध आडे यांनी कामकाज पाहिले.



