क्राइम

पुसद शहरात अवैधरित्या गॅस सिलिंडरचा साठा करणाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई!

पुसद :मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाच  मोठे संकट उभे राहिले आहे. या जागतिक घडामोडींचा फटका भारतालाही बसत असून नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कठीण काळात गॅस सिलिंडरची साठेबाजी करून काळाबाजार करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध यवतमाळ जिल्हा पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे.एकीकडे राज्यात घरगुती गॅस सिलेंडर मिळवा यासाठी नागरीक लांबच लांब रांगामध्ये उभे ठाकले आहे. भर उन्हात अबालवृद्ध आणि महिलांना गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर नोंदणीसाठी उभे राहावे लागत आहेत. तीन चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर सिलेंडर मिळत असल्याची ओरड नागरीक करत आहेत. त्यातच एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी राज्यभरात पुरवठा विभागाने धडाधड कारवाई सुरू केली आहे त्याच अनुषंगाने पुसद शहरातील नुर कॉलनीत अवैधरित्या गॅस सिलेंडरसह रेगुलटरचा साठा करणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखे यवतमाळच्या पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला असून अवैध गॅस सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध गॅस सिलेंडर साठवणुक, अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो. से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दि. १३मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस सिलेंडर साठवणुक, बाबत गोपनिय माहीती काढत असतांना १२/०० वाजण्याचे सुमारांस माहीती मिळाली कि, इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध गॅस सिलेंडर साठवणुक करुन काळया बाजारात जादा किंमतीने विक्री करीत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने पुरवठा निरीक्षक पुसद तसेच पंचासह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध भारत, एचपी (HP), व इण्डेन अशा वेगवेळया कंपनीचे एकूण ४० गॅस सिलेंडर तसेच २३ रेंग्युलेटर मिळून आल्याने इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची रा. नूर कॉलनी सुभाष वार्ड पुसद ता. पुसद जि. यवतमाळ याचेकडे सदरचे गॅस बाबत विचारपूस केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदरचे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या साठवणुक करुन जादा दराने विक्री करीत असल्याने एकूण ४० गॅस सिलेंडर, २३ रेग्युलेटर असा अंदाजे २,५०,०००/- रु मुद्देमालासह जप्त करुन ताब्यात घेवून पुरवठा निरीक्षक पुसद यांच्या तक्रारी वरुन पुसद शहर पो स्टे येथे जिवनावश्यक वस्तू अधिनियमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी जे मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. तहसिलदार पुसद रेखा वाणी मॅडम यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोहवा कुणाल मुंडोकार, पोशि सुनिल पंडागळे, पोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मपोहवा मनिषा वाघमारे पो स्टे पुसद शहर, मपोशि/संदली चांदले RCP पथक तसेच निरीक्षण अधिकारी अमोल महाजन, पुरवठा निरीक्षक आशिष पवार, संगिता तेर, अव्वल कारकून छाया जामकर, लिपीक अमित अजमिरे, छाया लोंढे, गोदाम व्यवस्थापक सतिष आळणे तहसिल कार्यालय पुसद यांनी यशस्वीरित्या पार पाडली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील स.पो.नि.शुभांगी गुल्हाने यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close