ईतर

महिलांनो मानसिक आरोग्य जपा;हळदी कुंकवातून संदेश!

अश्विनी पाटील चोंढीकर व डाॅ.ईशा कदम यांच्या संकल्पनेतील भव्य रांगोळीतून प्रबोधन

पुसद, : मराठा महिला मंडळ पुसदचे रविवारी (ता.४ ) येथील देवराव पाटील चोंढीकर सभागृहात मोठ्या उत्साहात हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला.या ठिकाणी साकारलेल्या भव्य रांगोळीतून नारीशक्तीचा जागर करुन हजारो महिलांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या.
मराठा महिला मंडळ पुसद तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून मकर संक्रातीच्या निमित्ताने सामुहिक हळदी कुंकवाचे आयोजन करुन नारी शक्तीचा जागर करुन हजारो महिलांचे प्रबोधन केल्या जाते. सद्यस्थितीत विभक्त कुटुंब पद्धती,भौतिक साधनांचा अति संग्रह,स्पर्धा,नोकरीतील ताणतणाव आदींमुळे स्रियांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडून विविध आजार वाढत स्री ही एकलकोंडी होऊन त्याचा संपूर्ण समाज व्यवस्थेवर परिणाम होऊन महिलांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या सर्वांमधून बाहेर पडण्याच्या उदात्त हेतूने श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सचिव अश्विनी पाटील चोंढीकर व डाॅ.ईशा कदम यांनी ‘तु एकटी नाहीस’ या संकल्पनेतून महिलेची भव्य रांगोळी साकारुन झारीव्दारे पाण्याच्या थेंबांनी सिंचन करुन महिलांनी चिंतन,प्राणायाम,योग
सकस आहार,सकारात्मकता,मन:शांती,व्यक्त होणे यांचा अंगीकार करुन आपले आरोग्य जपावे तर महिलेच्या लगत सप्तरंगी इंद्रधनुष्याची प्रतिकृती काढून त्यामध्ये नकारात्मकता, ताणतणाव, अतिविचार,आळस,अनारोग्य,एकलकोंडेपणा व अस्वस्थता यांना त्यागून जीवन नंदनवनासारखे फुलविण्याचा संदेश दिला.प्रा.माया राऊत यांच्या ‘मन करा ग प्रसन्न’या काव्याने त्यात भर टाकून महिलांनी शरीराचे बाह्य सौंदर्य खुलविण्यापेक्षा अंतरंगाकडे लक्ष द्या व एकमेकींच्या संगतीने मनाचे आरोग्य जपा असा संदेश दिला.यावेळी मराठा महिला मंडळाच्या अध्यक्ष डाॅ.आशा कदम,उपाध्यक्ष वर्षाताई पाटील,शकुंतलाबाई मैंद,वनिताताई पाटील चोंढीकर,डाॅ.रजनी गायकवाड, संध्या महल्ले,अनिता हिरवे सविता ठाकरे, वृषाली माने, प्रा. संध्या रावते, लीलाताई पाटील कामारकर, सुनीता खेडकर,स्वाती पाटील, शकुंतलाताई शिलार, सुनिता अडकिने, शुभांगी देशमुख, शुभांगी पानपट्टे, वंदना जामगडे,छाया पाटील,स्मिता पाटील ठेंगे,अॅड. छाया देशमुख, लता देशमुख, शुभदा मैंद, अंजली असोले, विना सावदे, शिवनंदा शिलार, प्रमिला यरमुलकर, उज्वला खंदारे,रेणूश्री देवसरकर, विद्यांजली पोहरकर, नीता मगर, जयश्री देशमुख,महानंदा पाटील, किरण जगताप, मधुबाला जामगडे,स्मिता कदम, युगंधरा कामारकर, भारती जळगावकर, लता फरकांडे, मोहिनी खराटे, दर्शना काळे,वैशाली गायकवाड, पुनम जगताप, प्रगती शेळके, राधिका पाटील,मेघा गावंडे, शिल्पा देशमुख, वर्षा दहागावकर, दिपिका खराटे, वनिता मिरासे, कांचन ठाकरे आदी महिलांनी एकत्रित येऊन तब्बल बाराशे महिलांना हळदी कुंकवाचे वाण देऊन मनोमिलन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close