ईतर

विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त; महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

पुसद: तालुक्यातील महावितरणच्या मारवाडी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या बेलोरा,रोहडा,कुंभारी भागात विजेच्या लंपडावामुळे महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला असून या कारभाराचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त झाले आहे.त्यामुळे या परीसरात नागरीकांची डोकेदुखी वाढु लागली आहे काही कारण नसताना दिवसा तसेच रात्रीला वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत संबंधीत कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी विचारणा केली असता समाधान कारक उत्तर मिळत नाही तर कधी तार तुटला असे उडवा उडविचे उत्तरे देवून भ्रमणध्वनी बंद करून ठेवण्यात कर्मचारी धन्यता मानत आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत याभागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.सध्या सरपटणारे प्राणी बाहेर पडतात विजेच्या लपंडावामुळे नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण आहे.पंरतु महावितरणच्या मारवाडी, उपकेंद्र अंतर्गत रोहडा, कुंभारी, बेलोरा या भागात शुक्रवार अकरा वाजेपासून संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्याचा हा प्रकार सर्रास सुरु असूनयंत्रेणेतील दोष दूर करण्यासाठी पावले उचलली जात नाही त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे.सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार भ्रमणध्वनी व्दारे संपर्क साधला असता संबधीत अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने बोलले जात आहे.त्यामुळे आताकुणाकडे दाद मागावी असा प्रश्न विचारला जात आहे यापूर्वी असा प्रकार कधी पाहायला मिळत नव्हता वारा पाऊस पडला तरच वीजपुरवठा खंडित होत होता आता दिवसातून कितीतरी वेळा विजपुरवठा वारंवार खंडीत होतो याचा फटका नागरिकांना व शेतकऱ्यांना बसत आहे.या समस्येकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा वेळकाढूपणा कारणीभुत असल्याची टीका केली जात आहे. संबंधित ठेकेदाराने कामे व्यवस्थित नसल्या चे चित्र पाहायला मिळते कधी कोणती समस्या निर्माण झाल्यास ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन होत नाही दोन दोन दिवस प्रतिक्षा करावी लागते विजवितरणचे अशा या कारभारामुळे नागरिकांत कमालीचा अंसतोष निर्माण होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष वेधून त्वरीत उपाययोजना करावी व यास जबाबदार असणाऱ्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close