तलवारी घेऊन फिरणार्या युवकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

पुसद : येथील संभाजीनगर परिसरात निवडणुकीच्या काळात तलवार घेऊन फिरणार्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार दि.६ नोव्हेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतले.पुसद परिसरात स्थागुशा पथक गस्त करीत असताना खबऱ्याच्या गुप्त माहितीवरून संभाजीनगर जवळ एक युवक तलवारी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने युवकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. त्याने शेषराव उत्तम लोंढे व २८ वर्ष ,रा संभाजीनगर ता.पुसद जि. यवतमाळ,असे नाव सांगितले.संशयित आरोपी शेषरावकडून एक लोखंडी स्टीलच्या दोन तलवारी प्रत्येकी किंमत अंदाजे २०००/- रुपये एकूण किंमत ४०००/- हजार रुपये ताब्यात घेऊन त्याच्यावर शस्त्र अधिनियमनुसार कलम ४२५ आर्मॲक्ट नुसार पुसद शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मा.कुमार चिता पोलिस अधीक्षक यवतमाळ,मा.पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ,मा. हर्षवर्धन बिजे उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद,स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सह पोलीस निरीक्षक गजभारे, पीएसआय लोहकरे, जमादार संतोष भोरगे,तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, सुनील पंडागळे,मो.ताज,डीपीएसटी रवि शीररामे यांनी ही मोठी कारवाई केली आहे.



