ईतर

पुसद-भोजला-जांबबाजार रस्त्यासाठी रास्ता रोको ;शरद मैंद यांची आंदोलन स्थळी भेट 

■ शुक्रवारपासुन काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पुसद : मागिल तिन वर्षा पासुन मंजूर होऊनही पुसद–भोजला जांबबाजार-लाखी रस्त्याचे काम रखडले आहे. यापूर्वी आंदोलन केल्या नंतर थोडे काम करून पुन्हा थांबविण्यात आले होते. दरम्यान अपूर्ण कामा मुळे या मार्गांवरून दररोज ये जा करणाऱ्या रुग्ण, वृद्धव्यक्ती, विद्यार्थी, महिला अश्या हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे १६ डिसेंबर रोजी नागरिकांनी आंदोलनाचा ईशारा दिला होता. मात्र कंत्राटदाराच्या मुलीचे लग्न आटोपताच २३ डिसेंबरला काम सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र काम सुरु होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने २६ डिसेंबर रोजी अशोक राऊत, गणेश धुमाळ भोजला व गौस खान जांबबाजार यांनी पुढाकार घेत सकाळी ९ वाजतापासून शेकडो महिला पुरुषांच्या सहभागाने तब्बल ६तास रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे रहदारी ठप्प झाली. आंदोलनाबद्धल माहीत होताच शरद मैंद यांनी आंदोलनस्थळी जाऊन मागणीला पाठिंबा दर्शवीत सर्व माहिती घेतली. दरम्यान कार्यकारी अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग,पुसद यांचे वतीने अशोक विठठलराव राऊत यांना जा. क्र. ६३६५ / प्रअरस्ते / आज उप कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीने पत्र पाठवीत जिल्हासिमेपर्यत प्रजिमा-३२ कि. मी. ०ते ७ रस्त्याचे उर्वरीत काम दिनांक २७डिसेंबर२०२४ पासून सुरु करुन लवकरात लवकर पूर्ण करण्यांत येईल. तरी सदर रस्त्यावरील आजचे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यांत यावे. अशी विनंती करण्यात आली. वरील लेखी आश्वासनानंतर आज सहा तास चाललेले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close