शैक्षणिक

वैष्णवीच्या ध्येय सक्तीपुढे पुढे झुकली परिस्थीती महागाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

महागाव/प्रतिनिधी(संदीप कदम):-डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवलेले आणि एका खेडेगावातील  गरीब विद्यार्थिनी शिक्षणाच्या  शर्यतीत जेव्हा उतरते तेव्हा तिच्या तेजाने समग्र नभोमंडल तेजोमय होते असे काहीसे घडले ते पोखरी इजारा तालुका महागाव येथील वैष्णवी रोहिदास राठोड या अचाट बुद्धिमत्तेच्या मुलीच्या यशाने .अखिल भारतीय प्री मेडिकल प्रवेश परीक्षा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ७२० गुणांपैकी ७०० गुण मिळवून ऑल इंडिया रँक मध्ये ती २३० वी आली , तर ऑल इंडिया ओबीसी ग्रुप मध्ये ती ४४व्या क्रमांकावर आली असून  तीच्या या दैदिप्यमान यशा पुढे आज संपूर्ण गगन ठेंगणे झाले आहे , वैष्णवी राठोड ची यशोगाथा फार खडतर असून  वडील अपघातात वारले आणि आई सुनीता यांच्या छत्रछायेखाली वैष्णवी चालत राहिली आज पावेतो , थोरली बहीण अश्विनी तिच्या पावलावर पाऊल ठेवत आज ती ही एमबीबीएस डॉक्टर ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे संपूर्ण कुटुंबाला कळताच आज सकाळपासून तिच्या तिला शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागलेली होती ,आपल्या तल्लख  बुद्धीच्या आधारे तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे , मामा चे मार्गदर्शन आणि त्यांचे आधारे शिक्षण घेत वैष्णवी ने आज भारतातील एमबीबीएस पूर्व परीक्षेत दैदिप्यमान यश  संपादन केले आहे .  चंद्रपूर येथील कनिष्ठ जय हिंद महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय तिने यश संपादन केले असून भारतातून ओबीसी ग्रुप मध्ये ती ४४ वी आली आहे , महागाव तालुक्यासह पोखरी इजारा या गावाचे नाव  सोबतच आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे केले आहे  ,तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या यशाबद्दल संपूर्ण महागाव तालुक्याला अभिमान वाटत आहे ., तिच्या या जिद्दीसाठी इतकेच म्हणावे वाटते की  ,चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला”अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close