ईतर

पुसद तालुक्यातील खैरखेडा येथील पाझर तलावात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी सापडला; एनडीआरएफच्या पथकाला यश!

पुसद: तालुक्यातील माळपठरावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैरखेडा येथील पाझर तलावात आडगाव येथील बाळू पांडुरंग पोटफाडे अंदाजे वय ३८ वर्ष हा दि.२७ सप्टेंबर२०२३ रोजी गणपती विसर्जनाकरिता पाझर तलावावर गेला असता त्याला पाण्याचा अंदाज नआल्याने तो पाझर तलावात बुडाला या घटनेची माहिती गावात व परिसरात वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी स्थानिकांनी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता मात्र त्यांना यश आले नाही.यावे या घटनेची माहिती खंडाळा पोलीस स्टेशनला देण्यात आली.त्यावे पोलीसांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,ग्रामीण भागांत गणरायाचे विसर्जन २७ सप्टेंबर रोजी पार पडले यावेळी आसपासच्या परिसरातील आजुबाजुच्या खेड्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी व घरगुती गणरायांच्या मुर्त्याचे विसर्जनाकरिता खैरखेडा येथील पाझर तलावात विसर्जन केले मात्र त्यादिवशी सदर युवक त्या पाझर तलावात बुडालेल्याने हि दुर्दैवी दुर्घटना घडली.दि.३० सप्टेंबर रोजी ताहसील प्रशासनाने एनडीआरएफ यवतमाळ च्या पथकाला पाचारण करून बुडालेल्या व्यक्तीचे शोधकार्य सुरू केले त्यावेळी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार महादेव जोरवर नायब तहसीलदार गजानन कदम यांच्यासह खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी या शासकीय अधिकाऱ्यांसोबतच स्थानिक नागरिक राजकीय नेते घटनास्थळी पहाटेपासूनच उपस्थित होते. अखेर एनडीआरएफच्या अथक प्रयत्नानंतर चौथ्या दिवशी या व्यतिचा मृतदेह काढण्यात यश आले . पाझर तलावावर नागरिकांची मोठी गर्दी केली होती.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुसद विधानसभेचे लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांनीही खैरखेडा येथील पाझर तलावाच्या घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी सुनील ढाले यांच्यासह अदी गावातील नागरिक उपस्थित होते. शासनाने प्रशासनाने या दुर्घटनेतील पीडित कुटुंबाच्या परिवाराला आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close