शिक्षकांनो, कामातून आनंद व आनंदाने काम करा- गटविकास अधिकारी संजय राठोड

पुसद : शिक्षण देणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे.जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुले ही मध्यमवर्गीय,गरजू व गरिबांची असल्याने शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी शिक्षकांनी त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच कामातून आनंद व आनंदाने काम करा असे आवाहन पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी केले.ते पुसद पंचायत समितीतील शिक्षण विभागातील अधिकारी, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थित पुसद पंचायत समितीतील जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी मंगळवारी (ता.४) आयोजित केलेल्या सहविचार सभेत बोलत होते.
सभेला गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण, विनायक भांगे, अमित बोजेवार,सर्व केंद्रप्रमुख,सर्व संघटनांचे अध्यक्ष सचिव, मनोज रामधनी, नंदेश चव्हाण, मधुकर मोरझाडे, ब्रह्मानंद राठोड,रणधिर आडे, भाऊराव जोगदंडे, उर्दू संघटनेचे अध्यक्ष,महेंद्र कोल्हे,दिलीप पवार, सुखदेव जुडे आदी उपस्थित होते.पुढे बोलतांना श्री.राठोड यांनी तसेच सर्व संघटनेच्या अध्यक्ष सचिव,केंद्रप्रमुख यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व संघटनेच्या सदस्यांना वर्ग व शाळेची गुणवत्ता कशा पद्धतीने वाढेल याबाबत संघटनेच्या सदस्यांना आवाहन करुन शिक्षण विभागाची आपली कर्तव्य व जॉब कार्ड याबाबत विस्तृत मार्गदर्शन करत सकारात्मक भूमिकेतून काम करणे,शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेचा सराव घेणे व शाळा व वर्गाची गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करणे तसेच पुसद तालुक्याला उच्च दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर नेऊन ठेवण्याचे काम करुन पुसद तालुक्यातील शाळांचे चित्र बदलले पाहिजे असे आवाहन करुन शाळा चांगल्या बनवणे व वैयक्तिक स्वच्छता शाळा व शिस्त याबाबत मार्गदर्शन केले तसेच शाळेत दहा मिनिटे आधी पोहोचावे आपणास समाजाला काहीतरी देणे आहे आणि आपण समाजाचे हित करू शकतो आपल्या कामाला आपण न्याय दिला पाहिजे उद्याचा भारत आपल्या हातात आहे शिक्षकामध्ये हा दगडाला पाझर फोडण्याची ताकद ठेवतो. जिल्हा परिषद शिक्षकाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे म्हणून संघटना म्हणून काम करीत असताना शाळेचे विद्यार्थ्यांचे हित त्याचबरोबर शिक्षकांचे हित जोपासून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उच्च पदाला नेण्याकरिता काम करावे असे आवाहन केले.



