पुसद येथे राजस्थान मंडळ कोजागिरी महोत्सव संपन्न;समाजातील गुणवंतांचा सत्कार!

पुसद :राजस्थान मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, विविध पदांवर नियुक्त समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दिवंगत शंकरलालजी गजाननजी पुरोहित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजय पुरोहित यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. मंचावर राजस्थान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गजबी, माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडे, राजस्थानी ब्राह्मण पंचायतचे अध्यक्ष नरेंद्र मानका, जांगिड समाजाचे अध्यक्ष ओम जांगिड, कार्याध्यक्ष अजय पुरोहित, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष शिल्पा गट्टाणी विराजमान होते.
कार्यक्रमांतर्गत नृत्य स्पर्धा, जाहिरात स्पर्धा, प्रतिभाशाली व्यक्तीची वेशभूषा सहित अभिनय स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोजागरी महोत्सवानिमित्त राजस्थान प्रीमियर लीगचे दोन दिवसीय क्रिकेट सामने पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर घेण्यात आले.
त्यामध्ये अग्रसेन फाईटर्स , माहेश्वरी वॉरीअर्स , शर्मा फायटर्स, परशुराम फायटर्स संघानी सहभाग घेतला होता.अतिम सामना परशुराम फायटर्स व माहेश्वरी फायटर्स मध्ये अतीतटीचा झाला त्यामध्ये परशुराम फायटर्स विजयी ठरले तर उपविजेते माहेश्वरी फायटर्स ठरले. क्रिकेट सामन्यात बेस्ट बँटमन व मँन आँफ द सिरीज चे मानकरी महेश शर्मा यांना प्राप्त झाला.क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार देण्यात आले. राजस्थान प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण कोजागरी महोत्सवात शिल्ड देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. क्रिकेट सामन्याच्या यशस्वी आयोजन साठी अमित चांडक व समाजाती नवयुवकांनी प्रयत्न केले. विजयी स्पर्धकांना व गुणवंत विद्यार्थ्यांना विविध संस्थेत प्रतिष्ठित पद व पुरस्कार प्राप्त समाज बांधवांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष सर्व गजबी यांनी चंद्रकांत राधा कृष्णाची आरती करून प्रसाद व दुध वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ज्योती अग्रवाल यांनी केले.राजस्थान मंडळ च्या कोजागिरी महोत्सव यशस्वीते साठी राजस्थान मंडळ चे अध्यक्ष चंन्द्रकांत गजबी , सचिव अँड. विनोदकुमार पनपालीया , कार्याध्यक्ष अजय पुरोहीत , कोषाध्यक्ष गणेश अग्रवाल , उपाध्यक्ष गोंविद वर्मा समेत समस्त कार्यकारणी मंडळाने अथक परिश्रम सहकार्य घेतले.सांस्कृतिक स्पर्धान साठी परिक्षक श्रेया अभिजित सरनाईक , ममता अभिजित गंधेवार उपस्थित होत्या.राजस्थान मंडळ कोजागिरी महोत्सव मध्ये राजस्थानी समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.



