राजकिय

नववर्षात ‘रिंग रोड’ला मुहूर्त; कृती समितीला डावलून खासदार आमदारांत श्रेयासाठी चढाओढ!

पुसद: शहराच्या विकासासाठी गेम चेंजर ठरू शकणाऱ्या ‘रिंग रोड’च्या कामांना लोकसभा निवडणुकीच्या आधी मुहूर्त मिळण्याची चिन्हे आहेत. रिंग रोडच्या कामांचे भूमिपूजन येत्या काही महिन्यात केले जाणार असल्याचे संकेत आहेत. या रिंगरोड मुळे शहराचा आर्थिक चेहरामोहरा बदलून जाणार आहे. २४की.मी.च्या रिंग रोडसाठी पुसदच्या सभोवतालची जवळपास ६५ हेक्टर जमीन भूपसंपादन करण्यात येणार असून यासाठी पहिला टप्पा ४८ कोटी ६४ लाख रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रिंग रोड कृती समितीला डावलून खासदार आमदारांमध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.                याबाबत प्राप्त माहिती अशी की,विदर्भाच्या एका टोकाला असणारे पुसद शहर विदर्भ मराठवाड्याला जोडणारे एक महत्वाचे शहर समजले जाते. त्यामुळे विदर्भातून मराठवाड्याकडे होणारी जड वाहतूक पुसदकरांसाठी डोकेदुखी ठरली होती. भर शहरातून होणारी ही जड वाहतूक अरुंद रस्त्यामुळे जणू अपघात प्रवण क्षेत्र झाले आहे. फू.ना. ते बा. ना. रस्त्यावरून अनेकांचे बळी सुद्धा गेले आहेत.त्यामुळेच पोलिस वाहतूक यंत्रणेवर प्रश्न चिन्ह लागले होते. या कारणास्तव पुसद शहराला रिंग रोडची मागणी जोर धरू लागली याच मागणीतून शहरात रिंग रोड कृती समिती अशोक बाबर यांच्या अध्यक्ष खाली स्थापन झाली तेव्हापासून पुसद येथील रीगरोड निर्माण कृती समितीच्या वतीने पुसद शहराकरीता रस्ते विकास योजने अंतर्गत २००१-२०२१ मध्ये पुसद शहराकरीता रींगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. सदर रींगरोड होण्याकरीता सन २०१५ पासून समितीच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आला असून त्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले आहे. शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेली पुसदकरांची डोकेदुखी अखेर कमी होणार आहे. त्यामुळे नव्या रिंगरोडचा कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधांसाठी उपयोग होणार आहे. यासाठी शासन स्तरावर प्रशासकीय मान्यता शासन निर्णय क्र.पिएलएन -२०२३/सी, आर. ११८.३४/नि-३ मंत्रालय मुंबई शासन निर्णय दि. १५ जानेवारी २०२४ रोजी रींगरोड मंजूर झाला असून रींगरोडचे पुढील बांधकाम करण्याकरिता संपूर्ण जमिनीचे भूसंपादन करण्यात येईल, सदर भूसंपादन करण्याकरीता महाराष्ट्र शासनाने रु. ४८ कोटी ६४ लाख रुपये पहिला टप्पा म्हणून मंजूरात देण्यात आली आहे.तसेच या रिंगरोडला मान्यतेसाठी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब म.रा. मुंबई, नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय, रस्ते व महामार्ग मंत्री नवी दिल्ली, रविंद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री, म.रा. मुंबई, भावनाताई गवळी खासदार वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघ, ॲड .निलय नाईक, आमदार, प्रविण दटके आमदार नागपुर, नितीनजी भुतडा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ,हरीशभाष सारडा, समाजसेवक कार्यकर्ता वाशिम, पंजाबराव देशमुख खडकेकर, सतिश भुसाळे, विशेष सहकार्य व पुसद तालुका पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मिडीया, तसेच प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याकरीता अतोनात प्रयत्न करुन देणारे अधिकारी वर्गातुन एस.एस.साळुंके साहेब, सचिव रस्ते सा.बा. विभाग मंत्रालय मुंबई,प्रज्ञा वाळके उपसचिव रस्ते सा.बा.विभाग मंत्रालय, मुंबई, गिरिष जोशी साहेब मुख्य अभियंता सा.बां. प्रा. विभाग अमरावती, संभाजी धोत्रे साहेब अधिक्षक अभियंता, सा.बां. मंडळ पबतमाळ, कचरे साहेब अवर सचिव (नियोजन सा.बा. विभाग) मंत्रालय, मुंबई,व्ही.पी. अडसुळे साहेव कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, यवतमाळ,कु. प्रिया पुजारी कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, पुसद प्रकाश झळके उपविभागीय अभियंता सा. वा. विभाग पुसद, पुसद शहराकरीता राँगरोडच्या प्रशासकीय मंजूरीसाठी या सर्वांनी सहकार्य केल्यामुळे पुसद शहर व तालुक्यातील नागरीकांच्या वतीने आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले असल्याची माहिती रिंग रोड कृती समितीचे अध्यक्ष अशोक बाबर यांनी दिली आहे.परंतु या रिंग रोडच्या मंजुराती वरून आमदार खासदारांमध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.”मेहनत करे मुर्गा-अंडा खाये फ़क़ीर’..वाली नीयत अच्छी नहीं होती”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close