क्राइम

मोराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक; वन विभागाचे फिरते पथक पुसद यांची मोठी कारवाई!

पुसद : तालुक्यातील शेंबाळपिपरी वनपरिक्षेत्रातील देवठाणा परिसरात राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणाऱ्या दोघा जणांना वनविभागाच्या फिरत्या पथकाकडून अटकेची कारवाई केली असून त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य सुद्धा मृत मोर व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

याबाबत वन विभागाच्या सूत्राने दिलेली माहिती अशी की, पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्र परिसरात दि.२४ ऑक्टोंबर २०२४ रोज गुरुवार सुमारे साडेअकरा वाजल्याच्या सुमारास श्रीरंग प्रभाकर डाखोरे वय (४२) वर्ष रा. देवठाणा ,मोतीराम वाघोजी तोरकड वय(६०) वर्ष रा. देवठाणा ता.पुसद जि. यवतमाळ हे दोघे जण शिकारीचे साहित्य घेऊन मोराची शिकार करताना वन विभागाने लावलेल्या मायक्रो कॅमेरा द्वारे व सेटलाईटवरून त्यांच्या मोबाईल लोकेशन वरुन आढळून आले. या शिकाऱ्यांना वनविभागाच्या ऑफिसमध्ये कनेक्ट केले जंगलामधील ड्रोन कॅमेरा वरून शिकारी देवठाणा फाट्याजवळ दुसऱ्यास मोबाईल लावून बोलत असताना त्यांच्या फोनवर संपर्क केला असता शिकाऱ्यांना देवठाणा

फाट्याजवळ वन विभागाच्या फिरत्या पथकाने उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक पुसदचे आरएफओ शेख मुखबीर, शेख गुलाब, साहेबराव निथळे, गिरीश डांगे, रवि राठोड, मोहिनी आडे, कांचन राठोड चालक केशव गेडाम, किरण सातपुते यांनी सापळा रचून कारवाई करत शिकारी करिता वापरण्यात आलेल्या साहित्यासह दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्र (प्रादे)कार्यालयात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहेया प्रकरणाचा अधिक तपास वन विभागाचे अधिकारी हे करीत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील या संशयीतांनी शिकारीचे प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close