शिकार करणाऱ्याचा आपसात वाद झाल्याने बारा बोर बंदुकीने झाडल्या गोळ्या एक तरुण घायाळ; खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मारवाडी शिवारातील घटना!

पुसद: यंदा जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे.प्राण्यांच्या मांसाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने त्यांची शिकार करून त्याचे मांस विकण्याचा व खाण्याचा गोरखधंदाच या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पुसद वनविभाग वनपरिक्षेत्र काळी (दो) मधील वर्तुळ काळी मध्ये वन्यप्राणी निलगाय शिकार प्रकरणाची घटना ताजी असताना अनेक वेळा जंगलात वनप्राण्याची शिकार होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या तरी वनविभाग जाणीवपूर्वक पेट्रोलिंग (गस्त) नकरता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. तर काल रात्री शिकारीसाठी निघालेल्या शिकाऱ्यांमध्ये आपसात वाद झाल्याने एका शिकाऱ्याने दुसऱ्या शिकाऱ्यावर बारा बोर च्या बंदुकीचा वापर करून एका तरुणास गंभीर घायाळ केल्याची घटना उघडकीस आल्याने पुन्हा वन प्रकरणाच्या शिकारीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मारवाडीशिवारात दि.१४ जून २०२३ रोजीच्या मध्यरात्रीनंतर १२:०० ते १:०० वाजण्याच्या सुमारास बारा बोरच्या बंदुकीने फायरिंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फायरिंगमध्ये माळ पठारावरील फेट्रा गावातील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रात्रीच्या वेळी परिसरात फायरिंग झाल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. फायरिंग प्रकरणी जखमीच्या काकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती खंडाळा पोलिस सुत्रांनी दिली आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नावश्याम अनिल कुरुडे रा. फेट्रा असे आहे. खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवारात श्याम व त्याचा काका रात्रीला दुचाकीने शिकारीला गेले असता त्यावेळी श्याम सोबत एकाने पैशाच्या कारणावरून वाद निर्माण केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने बारा बोरची बंदूक काढून चार ते पाच राऊंड फायर केला.त्यातील एक छर्रा श्यामच्या कमरा खाली लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या शामला रात्रीच यवतमाळ येथे अधिक उपचाराकरिता दाखल केले होते परंतु वृत्तलिहोस्तोवर या प्रकरणाची अधिकृत माहिती मिळाली नसून खंडाळा पोलिसांनी श्यामच्या काकाला संशयावरून ताब्यात घेतले आहे.वृत्तलिहोस्तोवर खंडाळा पोलिस स्टेशनमध्ये कोणीही तक्रार दिली नव्हती. सोबतच जखमीचे सुद्धा बयान नोंदविणे बाकी होते.त्यामुळे अधिकृत माहिती मिळू शकली नाही. परंतु पुन्हा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात शिकार प्रकरणाने डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परंतु या प्रकरणी वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे हे मात्र विशेष. सदर प्रकरणात खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यााशी संपर्क साधला असता त्यांनीी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.



