ईतर

पुसद येथील माणूसकिची भिंत सोशल फाउंडेशनला ‘भगिरथ’ पुरस्काराने सन्मानित .       

पुसद : यवतमाळ येथील ज्येष्ट नागरिक मंडळ व स्व.माधूरी पद्माकर महाजन सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी यवतमाळ जिल्ह्यातील अविकसीत क्षेत्रातील समाजाची सेवा देणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी विविध पुरस्कारांने सन्मानित करण्याचा पायंडा पाडला आहे ,त्याचाच एक भाग म्हणून पुसद येथील माणुसकिची भिंत सोशल फाउंडेशनचे संस्थापक गजानन जाधव व त्यांची टिम दररोज ग्रामीण उप जिल्हा रुग्णालयात सकाळ संध्याकाळ गरजू लोकांना अन्नदान,फळवाटप व शहरातील नैसर्गिक आपत्तीत झळ पोहचलेल्या अपादग्रस्तांना मदतीचा हात पुढे करणारी,भाउबीज, रक्षाबंधन सारखे सणात अनाथ व गोरगरिब स्त्री पुरुषांना कपडे लत्ते अहेर करून मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था माणूसकीची भिंत करित आलेली आहे.

त्यांचे कार्याची दखल घेउन त्यांना २०२२ चा ‘भगीरथ’ पुरस्कार व दहा हजारार रुपये बक्षीस माणुसकीच्या भिंतीला जाहीर झाला होता पण २०२२ भगीरथ पुरस्काराचा कार्यक्रम लॉकडाऊन असल्यामुळें तो पुरस्कार या वर्षी १६ मार्च २०२६ रोजी माणुसकीची भिंत सदस्यांना देण्यात आला. २०२२ ला पुरस्काराचे दहा हजार रूपये संस्थेच्या खात्यातत टाकले होते भेटलेल्या पुरस्कारा च्या पैशाने २०२२ मध्ये पुसद परिसरातील हजारो गरजवंतांना लॉकडाऊन मध्ये किराण्याची खूप आवश्यकता होती ती पाहता संस्थेने त्या पैशाच्या किटा वाटप केल्या हे मोठ्या प्रमाणात किटा वाटपाचे काम पाहता नंतर पुसद परिसरातील दात्यांनी माणुसकीच्या भिंतीला किराणा किट करता मदत केली जवळपास ४५ क्विंटल गहू ३० क्विंटल तांदूळ व तेल चटणी मीठ हळद इतर किराणा ‘अन्नदान किट’ वाटप करण्यात आल्या होतं निस्वार्थाने सुरुवात केली तर कोणतेच काम छोटे राहत नाही.आपणही सढळ हाताने माणूसकीची भिंतला हातभार लावीत राहील्यास अन्नदानाचे कार्यात कधीही खंड पडणार नाही असे भावोद्गार अध्यक्ष गजानन जाधव यांनी व्यक्त केलेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close