ईतर

बालविवाहामुळे आयुष्य अंधारमय-व्ही.बी. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधीश-१, पुसद

पुसद:मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, यवतमाळ यांचे निर्देशानुसार तसेच तालुका विधीसेवा समिती, पुसद व वकिल संघ, पुसद यांचे संयुक्त विद्यमाने दि. १० एप्रिल २०२४ रोजी दुपारी २.१० वा पुसद येथील न्यायालयातील कैंटीग हॉलमध्ये ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ हया विषयावर ज्ञानदान कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. बी. कुळकर्णी, जिल्हा न्यायाधीश-१, पुसद यांनी मार्गदर्शन केले. मंचावर एन. बी. जाधव, २रे सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद एन. जी. व्यास, ३रे सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद, डि.जी. म्हस्के, सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद, व्ही. एस. वाघमोडे, २रे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर, पुसद, व्ही. बी. चव्हाण, ५वे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद उपस्थित होते.यावेळी व्यास साहेब, ३रे सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, बालविवाह ही प्रथा समाजाला अत्यंत घातक आहे. भारतात बालविवाह थांबविण्यासाठी सातत्याने जनजागरण मोहिम राबविल्या जात आहे. परंतु काही प्रांतात आजही बालविवाह होतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीला अडथळा तयार होतो. बालविवाह विरोधी कायद्यामध्ये शिक्षेचे प्रावधान आहे. असे आपल्या भाषणामध्ये आवर्जुन सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांनी बालविवाह निषेध अधिनियम २००६ मधील असलेल्या तरतुदीबाबत माहिती सांगितली. विवाहाचे मुलीसाठी वय १८ वर्ष व मुलासाठीचे वय २१ पुर्ण असणे गरजेचे आहे कायद्याच्या सदर तरतुदीचा भंग केल्यास व बालविवाह केल्यास तो विवाह कायद्यास मान्य होत नाही. अशा विवाहाला प्रोत्साहन देणारे आईवडील व इतर व्यक्ती यांनादेखील दंड केला जातो. कारावास व शिक्षा होवु शकते, असे मा. व्ही. बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधीश यांनी आपल्या भाषणात सांगितले.भारतामध्ये बालविवाह ही जुन्या काळापासुनची कुप्रथा आहे. तिचा नायनाट करणे गरजेचे आहे. कारण बालविवाहामुळे अल्पवयीन वधु-वरांचे आयुष्य हे अंधकारमय बनते. ही प्रथा थांबविण्यासाठी कायद्याने प्रतिबंध असला तरी समाजानेही या कार्यात सहभागी झाले पाहीजे. असे विचार माननीय जिल्हा न्यायाधीश यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. ममता सगणे यांनी पार पाडले, तर आभार प्रदर्शन अॅड. सुचिता नरवाडे यांनी सुनियोजीत पध्दतीने पार पाडले.या कार्यक्रमाला ॲड. श्वेता पांढरीपांडे, ॲड. सुशिला नरवाडे, ॲड. अमोल भालेराव, ॲड. इमरान चव्हाण, ॲड, सविता आढाव, ॲड. वर्षा कावडे तसेच इतर पुसद येथील वकील संघातील सदस्य त्याचप्रमाणे न्यायालयीन कर्मचारी श्रीमती. काळबांडे, अधिक्षक, भोयर, यावले, मदणे, भलगे, डाफ, चौधरी, खसाळे, कु. बेले, जोशी तसेच पोलीस कर्मचारी, जाधव, राठोड व सामान्य नागरीक पक्षकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close