राजकिय

आ.ॲड. इंद्रनील नाईक यांच्या प्रयत्नांना यश नगरोउत्थानमधून शहरातील पाणीपुरवठा साठी ६७ कोटी मंजूर;”जे काम आम्ही केले त्याचे श्रेय आम्हीच घेणार,,जे आम्ही नाही केलं त्याच श्रेय आम्ही मुळीच घेणार नाही”

पुसद :नगर परिषद पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत पुसद शहरासाठी ६७ कोटी ६० लक्ष रुपये मंजूरीसाठी आमदार इद्रनिल नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पुसदकरांसाठी मुबलक पाणी भेटावं यासाठी मागील दोन वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील होते. दि.३ जुलै २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन शासन निर्णय वित्त विभाग क्र. अर्थसं.२०२०/प्र.क्र.६५/अर्थ ३, दि.४ मे २०२० मधून पुसद पाणीपुरवठा योजनेस विशेष बाब म्हणून सूट देण्यात यावी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला, त्यानंतर तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.२ सप्टेंबर २०२१ रोजी योजना मंजुरीसाठी आपल्या स्तरावर योग्य कारवाई करावी करिता पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा करत होते.

        दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत पुसद शहरासाठी ६७ कोटी रुपयांच्या भरीव निधीसह पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली असून पुसद करांनी माझ्यावर जो विश्वास केला होता त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही सातत्याने विकासासाठी प्रयत्नशील राहील असेही मत इंदनिल नाईक यांनी व्यक्त केले.ते दि.१६ डिसेंबर रोजी स्थानिक शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषेदेत बोलत होते. तब्बल ६७ कोटीच्या मंजूर निधीची प्रशासकीय प्रत आपणास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि.१५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे प्रदान केल्याचेही आ.ॲड.इंद्रनील नाईक यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी या पत्रकार परिषदेत माजी पाणीपुरवठा सभापती राजूभाऊ दुधे यांनी सांगितले की या पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज पर्यंत लगातार पाठपुरावा केला जात आहे हे संपूर्ण यश नाईक परिवाराचे असून या कामाचे श्रेय फुकट फोटोसेशन करणाऱ्यांनी तर मुळीच घेऊ नाही या भागाच्या खासदार भावनाताई गवळी यांनी या मतदारसंघात असे कोणतीही ठोक केलेले एखादे काम सांगावे. असा खळबळजनक आरोप केला आहे. या पत्रकार परिषदेला कयूमभाई, ॲड . सुनील ढाले, श्रीकांत चव्हाण, अनेक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“जे काम आम्ही केले त्याचे श्रेय आम्हीच घेणार,,जे आम्ही नाही केलं त्याच श्रेय आम्ही मुळीच घेणार नाही”शहराची तहान भागविण्यासाठी माझे वडील माजीमंत्री मनोहरराव नाईक यांनी सन २०१६ पासून सातत्याने प्रयत्न केले.त्यात माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधे,माजी नगराध्यक्षा अनिता नाईक यांनीही नगरपालिका स्तरावर महत्वाच्या भूमिका वठविल्या. असेही बोलताना आमदार इंद्रनील नाईक यांनी सांगितले

माजी मंत्री मनोहरराव नाईकांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण निधीतून नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर सुसज्ज योग भवनाची निर्मिती करण्यात आली परंतु या भावनावर पुसद चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री संघटनेच्या वतीने कब्जा करण्यात आला असून याच भवनातून आपणास निवडणुकीत पराभूत करण्याचे कट रचल्या जात असल्याचा प्रश्न पत्रकार बांधवांनी उपस्थित केला असता आ.इंद्रनील नाईक यांनी आपणास कुणीच पराभूत करू शकत नाही, कारण या मतदार संघात माझे भरीव काम हीच माझी ताकद तळागाळातील जनतेचा आशिर्वाद नाईक कुटुंबियांसोबत असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी दाखविला,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close