पुसद तालुक्यात पाणी प्रश्न पेटला! जल जीवन मिशनचे काम रखडल्याने चक्क सरपंचालाच दोराने बांधून नागरिक धडकले उपविभागीय अधिकारी कार्यालयावर!
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे अनोखं आंदोलन!

पुसद:तालुक्यातील माळपठारवरील पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप घेत असून उन्हाळ्याची चाहुल लागताच माळ पठारावरील गावोगावातील नदी नाले विहिरी कोरड्या पडत असल्यामुळे पाणी प्रश्न पेटला आहे .यामुळेच माळ पठारावरील सावरगाव येथील सरपंचाला नागरिकांच्या रोषाचा तीव्र सामना करावा लागला असून सरपंचाचे हात बांधून नागरिकांनी व महिलांनी घागर मोर्चा काढत उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात आला आहे.उन्हाळा लागण्या अगोदरच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच माळ पठारवरील गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथील महिला व काही पुरुषांनी सावरगाव गोरे येथील ग्रामपंचायत सरपंचांना दोरीने बांधून घरातील घागरी हांडे घेऊन पुसद येथील उपविभागी अधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढला होता.नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून केंद्र सरकारने ‘जलजीवन मिशन’ योजने अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून ‘हर घर नल, हर घर जल’ ही महत्वाकांक्षी योजनासन २०२२ पासून सुरू केली होती परंतु तालुक्यातील अनेक गावांत ‘जलजीवन मिशन’च्या पाणीपुरवठा योजनेची कामे अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना ही कामे देण्यात आल्याने या जल जीवन मिशनच्या योजनेचे कामे अर्धवट अवस्थेत असून व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे केंद्र सरकारच्या ‘हर घर नल, हर घर जल’ या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे. ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच माळ पठारावरील नदी नाले कोरडे पडल्याने या परिसरातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे सावरगाव गोरे येथील संतप्त नागरिकांनी सरपंचांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे चक्क सरपंचालाच दोराने बांधून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा करून अनोखं आंदोलन केले आहे.त्यानंतर तहसील कार्यालय आणि नंतर पंचायत समिती येथे घागर मोर्च्या सुधा काढण्यात आला आहे. पुसद पंचायत समिती येथे गेल्यानंतर गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व दोन तास आंदोलकांशी चर्चा केली व जलजीवन मिशन योजनेच्या संबंधित अधिकाऱ्याची फोन वर संपर्क करून आंदोलकांच्या समस्या मांडल्या परंतु या प्रकरणाबाबत सर्व अधिकारी यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दुपारी २:०० वाजल्या पासून ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत हे आंदोलन चालले परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे नागरिक निराश झाले असून यापुढे हे आंदोलन तीव्र करणार असून राज्यमंत्र्याच्या घरावर घागर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मोर्चेकऱ्यांनी दिली आहे.तालुक्यातील या माळ पठारावरील भागात उशाला धरण असताना अनेक वर्षापासून पाणी टंचाई निर्माण होते. विशेष करून माळ पठार भागातील ४० गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा लागतात. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाही. दरवर्षी पाणीटंचाईच्या नावावर शासनाच्या तिजोरीवर कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारला जातो परंतु या नागरिकाच्या उशाला धरण असताना नागरिकाच्या मात्र कोरड घशाला आहे.
मी निवडणुकीत उभा राहिलो तेव्हा गावातील नागरिकांना सहा महिन्याच्या आत आपली पाण्याची समस्या सोडून देईन असे आश्वासन दिले होते परंतु जलजीवन मिशनचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच सकाळपासूनच गावातील महिला व पुरुषांच्या रोष सतत माझ्यावर येत असून माझ्या घरासमोर दररोज नागरिक येऊन मला आश्वासनाचे आठवण काढून देत आहेत नाईला जास्त आज त्यांनी माझ्याकडून या कामाची पूर्तता न झाल्याने मला दोऱीने बांधून उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले
प्रताप विठ्ठल बोडखे
सरपंच, ग्रामपंचायत सावरगाव गोरे



