माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये क्रिडा महाकुंभ वार्षिक महोत्सव

पुसद: येथील माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये महाकुंभ वार्षिक क्रिडा महोत्सव स्पर्धेचे आयोजन ३० डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे .विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती विकसित व्हावे .तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दूरदृष्टीकोन ठेवून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे . या क्रिडा स्पर्धेच्या शुभारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.विक्रम गट्टाणी, उपाध्यक्ष अमर आसेगावकर ,सचिव संदीप जिल्हेवार ,सहसचिव प्रीतीताई गट्टाणी, कोषाध्यक्ष रवी गट्टाणी,संचालक भागवत चिदरवार या मान्यवरांची उपस्थिती होती .क्रीडा स्पर्धेची सुरुवात सर्व मान्यवरांच्या अनुमतीने स्कूल गव्हर्नर तन्वी विक्रम गट्टाणी या विद्यार्थिनींच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले .स्कूल कॅप्टन अक्षरा भागवत चिदरवार या विद्यार्थिनींने क्रिडाविषयक शपथ सर्व विद्यार्थ्यांना घ्यायला लावले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्रसिंग चाैव्हाण यांनी केले. सदर स्पर्धेत पूर्व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभाग घेत आहेत .सदर स्पर्धेत खो खो, टेबल टेनिस, बुद्धिबळ, रनिंग ,शॉटपुट, स्पॉटजम्प ,मेडिसिन बॉल थ्रो ,बुक बॅलन्स ,शटल रन , क्रिकेट व ॲथलेटिक्स चे सर्व क्रीडा प्रकारांची स्पर्धा घेण्यात येत आहे .त्याचबरोबर 4 जानेवारी रोजी एअर शो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .या कार्यक्रमात हेलिकॉप्टर, हेक्साकॉप्टर ,रॉकेट्स ,एरोबॅटिक, रोबोटिक मॉडेल्स प्रदर्शन होणार आहे .या कार्यक्रमास पुसद परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक ,व सर्व नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात .सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्रसिंग चाैव्हाण,शाळा समन्वयक सुशील दीक्षित ,शाळेचे प्रशासकीय अधिकारी नेहा सोळंकी ,सर्व क्रीडा प्रशिक्षक ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सुनील सोमकुवर व आकाश खंदारे यांनी केले .