यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यातील परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीस अटक;स्थागुशा यवतमाळची मोठी कारवाई!

यवतमाळ/ जिल्हप्रतीनिधी : जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागांव, दिग्रस, आर्णी परिसरात
दि.७ सप्टेंबर२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अ उघड गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने पुसद उपविभागात पेट्रोलोग करीत असतांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन महागांव येथील अपराध क्रमांक २११/२०२३ कलम ४५७, ३८० भादवि चा गुन्हा १) कुणाल उर्फ पंजाब संतोष चव्हाण, २) लखन गणेश वाघमारे. ३) विपीन उत्तम काळे व त्यांचे इतर दोन साथीदार सर्व रा. वडद ब्रम्ही ता. महागांव यांनी केला आहे. माहितीचे गांभीर्य लक्षात घेवुन पथकाने लागलीच वडद ब्रम्ही येथे रवाना होवुन १) कुणाल उर्फ पंजाब संतोष चव्हाण यम २६ वर्ष, २) लखन गणेश वाघमारे वय २३ वर्षे, ३) विपीन उत्तम काळे वय ३५ वर्षे यांना ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने सविस्तर विचारपुस केली असता नमुद आरोपीतांना नमुद गुन्हयाची कबुली देवून सदर गुन्हया बरोबराच पुसद, दिग्रस, आणी, उमरखेड, पोफाळी परिसरात सुध्दा त्यांचे इतर दोन साथीदारासह गुन्हे केले असल्याची कबुली दिली असुन नमुद आरोपीतांकडून नगदी ११,०००/- रुपये तसेच १४,१३२ रु किमतीचे सोन्याचे दागीने, व चोरीच्या पैशातून विकत घेतलेली Yamaha R १५ मोटर सायकल किमंत २,००,०००/- रु असा एकुण ३.८५,१३२/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नमुद आरोपीतांकडून पो.स्टे. महागांव येथील ०१. पो.स्टे. पुसद ग्रामीण येथील ०१. पो.स्टे. वसंतनगर येथील ०१. पुसद शहर येथील ०१. पो.स्टे. पोफाळी येथील ०१. पो.स्टे. उमरखेड येथील ०१. पो.स्टे. आणी येथील २१ व पो.स्टे. पो.स्टे. दिग्रस येथील ०२ घरफोडीचे गुन्हे असे एकुण ०९ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.ही कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पो. नि. स्थागुशा आधारसिंग सोनोने, सपोनि अमोल सांगळे, गजानन गजभारे, चापोउपनिरी रेवन जागृत, पोलीस अंमलदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, पंकज पातुरकर, साहेले मिर्झा, कुणाल मुंडोकार, सुनिल पंडागळे, मो. ताज, दिगांबर गिते सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.