ईतर

नगर परिषदेच्या हद्दीतील सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला कंत्राटदाराकडून केराची टोपली!

पुसद: शहरातील व्यवसायिकांने शासनाचे व नगररचना विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आजही बांधकाम सुरूच ठेवले आहे.बांधकामामुळे बाजूचे कॉम्प्लेक्स धोकादायक स्थितीत आल्याने व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यावरून संबंधितांना बांधकाम तात्काळ बांधकाम थांबविण्याचे आदेश पारित केले होते.तशा नोटीस देखील बजावण्यात आल्या होती.तरीदेखील बांधकाम व्यवसायिकाने बांधकाम सुरूच ठेवल्यान मुख्यधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. नगरपरिषद हद्दीतील सुरू असलेल्याशासकीय कंत्रादार यांनी संबंधितांशी संगणमत करून नियमबाह्य कॉम्प्लेक्सचे सुरू केल्यामुळे या बांधकामा करिता नगररचना विभागाच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. या कॉम्प्लेक्सचा पाया खोदकाम करताना कमीत कमी तीन मीटर खोदकाम करणे बंधनकारक होते.मात्र संबंधित कंत्राटदराने या जागेवर सहा मीटर खड्डा खोदल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे आजूबाजूच्या बांधकामाला या खोदकामामुळे तडे गेले असून एका दुकानदाराची ये-जा करणारी मोकळी जागेतील जमीन उध्वस्त झाली होती तर नगरपरिषदेच्या हद्दीतील नपणे बांधलेल्या मालकीच्या नाली सुद्धा फुटली आहे.त्या संदर्भात मुख्याधिकारी यांच्याकडे संबंधितांनी तक्रार केल्यानंतर मुख्याधिकाऱ्याने तात्काळ बांधकामाच्या ठिकाणी धाव घेऊन सखोल चौकशी करून पंचनामे केला होता व हे बांधकाम नियमबाह्य असल्याचे आढळून आले होते.नियमबहाय्य बांधकामाबाबत मुख्याधिकाऱ्याने एक आठवड्यापूर्वीच बांधकाम थांबविण्याची आदेश काढले होते. त्याची पोच देखील संबंधित कंत्राटदाराला दिल्याचे सांगितले आहे .सोबतच कॉम्प्लेक्स बांधणाऱ्या अभियंत्यांला देखील नोटीस बजावण्यात आली आहे.तरी देखील नगरपरिषदेचे मुख्यधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवल्या जात आहे.त्यामुळे न.प चे मुख्याधिकारी वायकोस काय भूमिका घेतात याकडे आता बाजूच्या कॉम्प्लेक्स व्यावसायिकांसह सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.यापूर्वी सुद्धा शहरातील मुख्य बाजारपेठ याच व्यवसायिकाने शासनाचे व नगररचना विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसूनकोट्यावधी रुपये खर्च करून भले मोठे कॉम्प्लेक्स उभारले आहे. मंजुरात आराखड्यापेक्षा जास्त बांधकाम केल्याने त्या अवैध बांधकामावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कारवाई करणार का..? याकडे सर्व जनतेची लक्ष लागले आहे.

बांधकाम सुरूच ठेवत असेल तर नियमानुसार लायसन्स रद्द करण्यासाठी प्रयत्न करू..      न.प.च्या अभियंत्यांनी बांधकामाचे पंचनामे केले आहे. ठेकेदाराने नपला दिलेल्या कागदपत्राच्या नुसार बांधकाम होत नसल्याचे उघडकीस आले आहे.नियमबाह्य बांधकाम दिसून आल्याने कंत्राटदारांना नोटीस बजावलेली आहे.सोबतच कॉम्प्लेक्स बांधणाऱ्या इंजिनीयरला देखील कलम ५१ नुसार नोटीस बजावण्यात आलेली आहे.तरी देखील बांधकाम सुरू ठेवत असेल तर नियमानुसार लायसन्स रद्द करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जाईल-अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी,न.प.पुसद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close